IND vs SA 1st T20 : – भारतीय संघ बदलांच्या उंबरठ्यावर असताना संजू सॅमसन व अभिषेक शर्मा हे दुसऱ्या फळीतील खेळाडू शुक्रवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या चार सामान्यांच्या टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असणार आहेत. या स्पर्धेत त्यांची चमकदार कामगिरीच त्यांच्यासाठी राष्ट्रीय संघाचे दार उघडणार आहेत.
स्थळ : डर्बन
वेळ : रात्री 8.30 वाजता
भारताचा कसोटी कर्णधार असलेल्या रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे संजू सॅमसनला बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. त्याने दुसऱ्या लढतीमध्ये ४७ चेंडूत धडाकेबाज १११ धावांची खेळी करून संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य ठरविला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत काही चांगल्या खेळी करून राष्ट्रीय संघातील स्थान पक्के करण्याचा सॅमसनचा प्रयत्न असणार आहे.
अभिषेक शर्मासाठी देखील ही मालिका महत्वाची असणार आहे. जुलैमध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध हरारेमध्ये खेळताना शतक झळकावले होते. मात्र त्यानंतर त्याचा धावांसाठी संघर्ष सुरूच आहे. त्यालाही संघातील स्थान पक्के करण्यासाठी कामगिरीत सातत्य ठेवावे लागणार आहे. तो डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो, त्यामुळे त्यांच्याकडे फलंदाजीच्या बरोबरीने गोलंदाजीतही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. डावखुरा फलंदाज असणारा तिलक वर्माने ऑगस्ट २०२३ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध टी-२० मध्ये पदार्पण केले होते. मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्याने १२ टी-२० लढतीमध्ये केवळ १ अर्धशतक झळकावले आहे. यावर्षी जानेवारीत त्याने अफगाणिस्तान विरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळाला होता.
गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष
यष्टिरक्षक फलंदाज जितेश श्रमा व फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांना देखील चांगली संधी असणार आहे. चक्रवर्तीने बांगलादेश विरुद्ध ५ बळी टिपताना प्रभाव टाकला होता. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, आवेश खान, विषयक विजयकुमार व यश दयाल हे आफ्रिकेत कशी कामगिरी करतात, याकडे निवड समितीचे बारीक लक्ष असणार आहे. अर्शदीप आणि आवेश यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे तर दुसरीकडे विषयक व दयाल यांनी देशांतर्गत क्रिकेट व आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करताना संघात स्थान मिळविले आहे.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये चुरस
रमणदीप सिंगने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला केकेआरने संघात कायम ठेवले आहे. रमणदीप हा खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजी, मध्यमगती गोलंदाजी व चांगले क्षेत्ररक्षण असत असल्याने तो अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात जागा मिळविण्यासाठी उत्सुक असणार आहे. त्याबरोबरीने सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक पंड्या व अक्षर पटेल हे खेळाडू देखील मालिका संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न करतील.
Border–Gavaskar Trophy 2024-25 : ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका 3-1 ने जिंकणार – रिकी पॉन्टिंग
संघ खालीलप्रमाणे
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाख, आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, लुई सिमेला, लुई सिमेला (तीसरा आणि चौथा सामना), आणि ट्रिस्टन स्टब्स.