Team India : टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंची घोषणा का नाही? BCCIच्या सचिवांनी सांगितलं कारण

Team India not announce reserve players : आगामी टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मैदानात उतरणार आहे. या निवडीत सर्वात मोठा धक्का सलामीवीर शुभमन गिलला बसला असून, त्याला विश्वचषकाच्या मुख्य संघात स्थान मिळालेले नाही.
२० डिसेंबर रोजी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी पत्रकार परिषदेत या संघाची घोषणा केली. यावेळी केवळ विश्वचषकासाठीच नव्हे, तर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली.
रिझर्व्ह खेळाडूंची घोषणा का नाही?
🚨India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2026 announced 🚨
Let’s cheer for the defending champions 💪#TeamIndia | #MenInBlue | #T20WorldCup pic.twitter.com/7CpjGh60vk
— BCCI (@BCCI) December 20, 2025
साधारणपणे कोणत्याही आयसीसी (ICC) स्पर्धेसाठी मुख्य संघासोबत ‘स्टँडबाय’ किंवा ‘रिझर्व्ह’ खेळाडूंची घोषणा केली जाते. जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर या राखीव खेळाडूंमधून त्याची जागा भरली जाते. मात्र, २०२६ च्या विश्वचषकासाठी निवड समितीने अद्याप कोणत्याही रिझर्व्ह खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही.
हेही वाचा – Hardik Pandya : अर्धशतकानंतर फ्लाइंग किस ते विजयानंतर कार राइड….हार्दिक-माहिकाचा रोमँटिक VIDEO व्हायरल
या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देताना सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, “२०२६ चा टी-२० विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. स्पर्धा मायदेशात असल्याने एखाद्या खेळाडूची गरज भासल्यास देशांतर्गत उपलब्ध असलेल्या कोणत्याही खेळाडूला तातडीने पाचारण करणे सोपे होईल. जेव्हा स्पर्धा परदेशात असते, तेव्हा खेळाडूंना व्हिसा आणि प्रवासासाठी बराच वेळ लागतो, म्हणून रिझर्व्ह खेळाडू सोबत नेले जातात. परंतु, भारतात ही अडचण नसल्याने यावेळी स्वतंत्र रिझर्व्ह खेळाडूंची घोषणा करण्यात आलेली नाही.”
मागील स्पर्धांचा इतिहास –
यापूर्वी २०२४ च्या टी-२० विश्वचषकात शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान हे राखीव खेळाडू म्हणून संघासोबत होते. तसेच नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांची स्टँडबाय म्हणून निवड झाली होती. मात्र, घरच्या मैदानावर होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी बीसीसीआयने ही नवी रणनीती अवलंबली आहे.
हेही वाचा – Team India : संजू-हार्दिकने दिलदारपणाने जिंकली मनं! मैदानाबाहेर ‘त्या’ कृतीने चाहते भारावले, पाहा VIDEO
सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आता विजेतेपद राखण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, मायदेशातील प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर नाव कोरते का.





