सध्या आयपीएल 2025 अंतिम टप्प्यात आली आहे. यानंतर टीम इंडिया इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ इंग्लंडशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दरम्यान या दौऱ्यापूर्वी भारताचा क्रिकेटपटू प्रियांक पांचाळने सर्व प्रकारचया क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. प्रियांक पांचाळबद्दल बोलायचे झाले तर तो घरगुती क्रिकेटमध्ये गुजरात संघाकडून खेळायचा. प्रियांकने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर गुजरात क्रिकेट असोसिएशनने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हा एका युगाचा अंत आहे. प्रियांकने भारत अ आणि गुजरात संघाचे सर्व फॉरमॅटमध्ये नेतृत्व केले. आम्ही त्याच्या समर्पणाला सलाम करतो आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.’ असे गुजरात क्रिकेट असोसिएशनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. End of an Era! Gujarat Cricket Association congratulates Priyank Panchal on a stellar cricketing journey as he announces retirement from all formats on May 26, 2025. A prolific right-handed opener, Priyank scored 8856 First-Class runs with 29 centuries & 34 fifties, including a… pic.twitter.com/O3iFec6xmS — Gujarat Cricket Association (Official) (@GCAMotera) May 26, 2025 प्रियांक पांचाळची कामगिरी प्रियांक पांचाळच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2008 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यामध्ये त्याने 127 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 8 हजार 856 धावा केल्या, ज्यात 29 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट-ए मध्ये त्याच्या नावावर 3 हजार 672 धावांची नोंद आहे. 2016-17 मध्ये गुजरातला पहिले रणजी करंडक जिंकावण्यात प्रियांक पांचाळची महत्वपूर्ण भूमिका होती. त्याने विजय हजारे ट्रॉफी (2015-16) आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (2012-13 आणि 2013-14) देखील जिंकली आहे.