Team India : संजू-हार्दिकने दिलदारपणाने जिंकली मनं! मैदानाबाहेर ‘त्या’ कृतीने चाहते भारावले, पाहा VIDEO

Team India Players Hardik Pandya Sanju Samson video viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ३० धावांनी विजय मिळवत ५ सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली आहे. या विजयासोबतच हार्दिक-संजूने आपल्या फलंदाजीने आणि मैदानाबाहेरील दिलदारपणे चाहत्यांची मने जिंकली. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सॅमसनने चिमुकल्या चाहत्यांना दिले खास गिफ्ट –
बऱ्याच काळानंतर संजू सॅमसनला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. सलामीला फलंदाजी करताना त्याने २२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३७ धावांची आक्रमक खेळी केली. सामन्यातील विजयानंतर संजूने मैदानावर उपस्थित असलेल्या दोन लहान मुलांकडे जाऊन त्यांना आपले ‘ग्लोव्हज’ भेट म्हणून दिले. संजूचा हा प्रेमळ स्वभाव पाहून लहान मुले भारावून गेली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Sanju Samson gifted his gloves to the 2 little kids in Ahmedabad.
The humbleness and kindness of Sanju make him so special 🫡❤️pic.twitter.com/8fVJgAHQD9
— Tejash (@Tejashyyyyy) December 20, 2025
हार्दिक पंड्याने कॅमेरामॅनची घेतली भेट –
– Hardik Pandya smashed the six
– Ball hit the hard to cameraman
– After the innings, Hardik instantly came to meet him
– Hardik hugged the cameramanJust look at the cameraman’s reaction at the end; it’s so priceless. This small gesture from cricketers can make someone’s day… pic.twitter.com/stV156Og6K
— Tejash (@Tejashyyyyy) December 19, 2025
या सामन्यात हार्दिक पंड्याने फक्त २५ चेंडूत ६३ धावांची वादळी खेळी केली. त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याच्या पाच षटकारांपैकी एक षटकार मैदानावर एका कॅमेरामनला लागला. कॅमेरामनला तीव्र वेदना जाणवत होत्या आणि भारतीय संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या एका सदस्याने त्याच्यावर उपचार केले. त्याच्या हाताला बर्फाचा पॅक लावला. सामन्यानंतर हार्दिकने कॅमेरामनची भेट घेतली आणि त्याने पण त्याच्या हातावर बर्फाचा पॅक लावला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Gautam Gambhir : टी-२० वर्ल्ड कपसाठी मोठा बदल! कोच गंभीरचा ‘यू-टर्न’; सूर्यकुमारने केला खुलासा
मालिकावीर आणि सामनावीर –
अष्टपैलू कामगिरीसाठी हार्दिक पंड्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले, तर संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला ‘मालिकावीर’ पुरस्कार देण्यात आला. संजू सॅमसनने या सामन्यात आपल्या फॉर्मची चुणूक दाखवली, ज्यामुळे टी-२० विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात त्याला संधी मिळाली आहे.





