Team India : टीम इंडियाला मोठा धक्का ! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू इंग्लंड वनडे मालिकेतून बाहेर
युवा फलंदाज शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ (Team India) सध्या अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील अखेरचा सामना आज, शनिवारी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे.

Team India : युवा फलंदाज शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ (Team India) सध्या अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील अखेरचा सामना आज, शनिवारी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे.
या मालिकेनंतर (Team India) भारतीय संघ महत्त्वाच्या इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ आधी आयर्लंडविरुद्ध २ टी-२० सामने खेळेल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
बीसीसीआयने (BCCI) टी-२० मालिकेसाठी आधीच संघाची (Team India) घोषणा केली आहे, तर इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पुढील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
हार्दिक पंड्या वनडे मालिकेतून बाहेर (Team India)
स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर राहण्याची दाट शक्यता आहे. दुखापतीमुळे हार्दिक सध्या सुरू असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकला होता. तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) न झाल्याने निवड समिती इंग्लंड दौऱ्यासाठी त्याचा विचार करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
विराट कोहलीच्या पुनरागमनाचा निर्णय २२ जूनला
दुसरीकडे, क्रिकेटप्रेमींसाठी विराट कोहलीच्या फिटनेसची चिंता कायम आहे. आयपीएल २०२६ च्या फायनल दरम्यान विराट कोहली दुखापतग्रस्त झाला होता. याच दुखापतीमुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत विश्रांती घ्यावी लागली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने (COE) विराटशी संपर्क साधून त्याच्यासाठी एक विशेष रिहॅब प्रोग्राम तयार केला होता. विराट सध्या या दुखापतीतून वेगाने सावरत आहे. २२ जून रोजी विराट कोहली सीओई (COE) मध्ये जाणार असून तिथं त्याची अंतिम फिटनेस टेस्ट घेतली जाईल. या चाचणीच्या निकालानंतरच त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड होणार की नाही, हे स्पष्ट होईल.
रोहित शर्मासह ‘हे’ स्टार खेळाडू पूर्णपणे फिट
भारतीय संघासाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे माजी कर्णधार रोहित शर्मा, जो आयपीएल दरम्यान दुखापतीने त्रस्त होता, तो अफगाणिस्तान मालिकेपूर्वीच पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. याशिवाय ध्रुव जुरेल, केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी फिट असल्याचे सीओईच्या अहवालातून समोर आले आहे:
सीओईने आपला वैद्यकीय अहवाल निवड समितीकडे पाठवला असून, २२ जूनला विराटच्या चाचणीनंतर पुढील आठवड्यात इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अंतिम भारतीय संघाची घोषणा केली जाईल.






