Team India Schedule : आयपीएल संपताच ६ जूनपासून टीम इंडियाचे नॉन-स्टॉप सामने! या देशांशी भिडणार; पाहा संपूर्ण ६ महिन्यांचा शेड्युल
Team India Schedule : मार्चमध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यापासून भारतीय संघ कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला नव्हता, कारण भारतीय खेळाडू आयपीएल २०२६ मध्ये व्यस्त होते. आता आयपीएल संपल्यामुळे, भारतीय संघ ६ जून रोजी पुन्हा मैदानात उतरेल.

Team India International Schedule 2026 : आयपीएल २०२६ चा धमाकेदार हंगाम नुकताच संपला आहे. आरसीबी संघ आपले जेतेपद राखण्यात यशस्वी ठरला असून त्यांनी सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. आता विराट कोहली आणि शुबमन गिलसारखे स्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ३१ मे रोजी आयपीएल संपल्यानंतर अवघ्या एका आठवड्याच्या आत म्हणजेच ६ जूनपासून भारतीय संघाचे नॉन-स्टॉप क्रिकेट सामने सुरू होणार आहेत.
६ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटीने होणार सुरुवात!
भारतीय संघाचा हा आंतरराष्ट्रीय हंगाम ६ जूनपासून न्यू चंदीगडच्या मैदानावर सुरू होईल. येथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. यानंतर लगेचच दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वन-डे मालिका खेळवली जाईल. जून महिन्याच्या अखेरीस टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर दोन टी-२० सामने खेळण्यासाठी रवाना होईल.
जुलै ते डिसेंबर २०२६: इंग्लंड दौरा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार!
जुलै महिन्यात टीम इंडिया इंग्लंडच्या मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे ५ टी२० आणि ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. त्यानंतर जुलै अखेरीस संघ जिम्बाब्वे विरुद्ध ३ टी२० सामने खेळेल. ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर (२ टेस्ट आणि ३ टी२०) जाणार असून, सप्टेंबर महिन्यात युवा भारतीय संघ ‘आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६’ साठी जपानला रवाना होईल, जिथे टी-२० फॉरमॅटमध्ये सामने होतील. सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान भारत अनुक्रमे वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे.
🚨 News 🚨
Presenting #TeamIndia‘s squads for the @IDFCFIRSTBank Test match and the 3️⃣-match ODI series against Afghanistan in June 🙌#INDvAFG pic.twitter.com/hFiABALLld
— BCCI (@BCCI) May 19, 2026
टीम इंडियाचे आगामी ६ महिन्यांचे संपूर्ण वेळापत्रक:
जून २०२६:
- ६-१० जून: भारत विरुद्ध अफगाणिस्तान (१ कसोटी सामना)
- १३-२० जून: भारत विरुद्ध अफगाणिस्तान (३ वन-डे सामने)
- २६-२९ जून: भारतचा आयर्लंड दौरा (२ टी२० सामने)
जुलै २०२६:
- १-११ जुलै: भारतचा इंग्लंड दौरा (५ टी२० सामने)
- १४-१९ जुलै: भारतचा इंग्लंड दौरा (३ वन-डे सामने)
- २३-२६ जुलै: भारतचा जिम्बाब्वे दौरा (३ टी२० सामने)
ऑगस्ट २०२६:
- भारताचा श्रीलंका दौरा (२ टेस्ट, ३ टी२०) – तारीख जाहीर होणे बाकी
सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६:
- १७ सप्टेंबर – ३ ऑक्टोबर: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६, जपान (टी२० फॉरमॅट)
- २७ सप्टेंबर – ३ ऑक्टोबर: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (३ वन-डे सामने)
- ६-१७ ऑक्टोबर: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (५ टी२० सामने)
ऑक्टोबर आणि डिसेंबर २०२६:
- २२ ऑक्टोबर – डिसेंबर: भारतचा न्यूझीलंड दौरा (२ टेस्ट, ५ वनडे, ५ टी२०)





