टीम इंडियाला 2024 मध्ये मिळू शकतो नवा कॅप्टन ! ‘या’ खेळाडूकडे सोपवले जाऊ शकते नेतृत्व

IND vs AFG T20 : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना झाला असून अजून एक सामना खेळायचा आहे. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघ सध्या बॅकफूटवर आहे. दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न यावेळीही अधुरेच राहणार आहे. मात्र, दुसरा सामना जिंकून किमान मालिकेत बरोबरी साधण्याची भारतीय संघाला संधी आहे. तिसरा आणि शेवटचा सामना ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. यानंतर भारतीय संघ मायदेशी परतेल आणि त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होईल. बीसीसीआयने अद्याप यासाठीचा संघ जाहीर केला नसला तरी लवकरच संघ जाहीर होईल, असे मानले जात आहे. या मालिकेत भारतीय संघाला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 11 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या टी-20 मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या मालिकेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे समजते. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता. यानंतर तो आजतागायत परतला नाही.पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्येच तो मैदानात परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली. तो देखील लवकर फिट होईल असे वाटत नाही. रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेसोबतची कसोटी मालिका संपल्यानंतर तो जानेवारी ते मार्च या कालावधीत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग असेल. यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.त्यामुळे रोहित अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार कि नाही यात शंका आहे. अशा परिस्थितीत शुभमन गिल कर्णधार म्हणून पुढे येऊ शकतो. शुभमन गिलने यापूर्वी भारतीय संघाचे नेतृत्व केले नाही, सध्या त्याला गुजरात टायटन्सने त्याला पुढील हंगामासाठी आयपीएलमध्ये आपला कर्णधार बनवले आहे. याआधीही त्याला टीम इंडियाची कमान मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामने
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार असल्याने ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत या मालिकेपूर्वी कोणताही मोठा खेळाडू जखमी होऊ नये यासाठी बीसीसीआय प्रयत्न करेल, अशा परिस्थितीत रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे खेळाडूही या मालिकेचा भाग नसतील. असे झाले तर शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली बहुतांश युवा फलंदाज त्यात खेळताना दिसतील. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात बीसीसीआय अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करेल, असे मानले जात आहे.





