आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या
Updated On:

धुळे – आजारपणाला कंटाळून आश्रम शाळेतील शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना साक्री तालुक्यातील चिंचपाडा येथे घडली आहे. छोटू झिपरू पवार (वय 50) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांचे कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना जिभेचा कर्करोग झाला होता.
शस्त्रक्रीया होऊन देखील कर्करोग बरा न झाल्याने त्यांच्या मानेला गाठी निर्माण झाल्या होत्या. त्यांनी आजारपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना मृत घोषित केले. याबाबत पिंपळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





