शिक्षक भरती लवकरच; शिक्षणमंत्र्यांची माहिती

पुणे – शिक्षक भरती पवित्र पोर्टल माध्यमातूनच होणार आहे. मध्यंतरी एसईबीसी संवर्गास स्थगिती दिल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती. एकूण 6 हजार शिक्षकांची पदे भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एकूण 6 हजार शिक्षकांची पदे भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. मात्र, हा प्रस्ताव सध्या सामान्य प्रशासन विभागाकडे आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. लवकरच भरतीप्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. तपासात दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रा. गायकवाड यांनी स्पष्ट केले.





