हवाहवासा ‘टिडीएम..’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर

Updated On:

मुंबई – ख्वाडा चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे नेहमीच काहीतरी हटके घेऊन येत असतात. ख्वाडा नंतर ‘बबन’ चित्रपटातून कऱ्हाडे यांनी ग्रामीण तरुणाचा प्रवास सर्वांना उलगडून सांगितला होता. ख्वाडा आणि बबनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर कऱ्हाडे यांनी आपल्या आगामी टीडीएम या चित्रपटाची घोषणा केली होती. हटके टायटल असल्यामुळे हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे.

ख्वाडा आणि बबन या दोन्हही चित्रपटांमध्ये भाऊसाहेब शिंदे मुख्य भूमिकेत होते. टीडीएमचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची उत्कंठा चांगलीच वाढली होती.  मात्र आता या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यात आले आहे. दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत याबाबत सांगितले आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, रसिक प्रेक्षकहो नमस्कार,… मला माहिती आहे तुम्हाला ‘टीडीएम’ सिनेमा थिएटरमध्ये बघायची इच्छा आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मी ‘टीडीएम’चे प्रदर्शन तूर्तास थांबवत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तुम्ही करत असलेल्या सहकार्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार ! असं म्हणत लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

“प्रेमाचा, लाडाचा, हसवणारा,रडवणारा, आपल्या सगळ्यांचा.. हवाहवासा टिडीएम… आता नव्या तारखेला… कधी प्रदर्शित होणार’ अशा कॉमेंट्स चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे.  ख्वाडा आणि बबन या चित्रपटात सामाजिक भान जपून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कऱ्हाडे यशस्वी झाले होते. त्यामुळे टीडीएमकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Richa Chadha: सोशल मीडिया पोस्टवरून ऋचा चड्ढाला कोर्टाची सुनावणी; ‘मॉलेस्टर’ म्हणताच वाढला वाद

2026-04-01 13:28:55

Richa Chadha: सोशल मीडिया पोस्टवरून ऋचा चड्ढाला कोर्टाची सुनावणी; ‘मॉलेस्टर’ म्हणताच वाढला वाद

Ranbir Kapoor In Ramayana: ‘मी या भूमिकेसाठी योग्य नाही’ म्हणत रणबीर कपूरने रामाची भूमिका नाकारलेली; पण आयुष्यातील 'या' बदलामुळे घेतला मोठा निर्णय

2026-04-01 10:14:38

Ranbir Kapoor In Ramayana: ‘मी या भूमिकेसाठी योग्य नाही’ म्हणत रणबीर कपूरने रामाची भूमिका नाकारलेली; पण आयुष्यातील 'या' बदलामुळे घेतला मोठा निर्णय

Bhumi Pednekar Fitness: भूमी पेडणेकरचा मोठा निर्णय! आता भूमिकांपेक्षा स्वतःच्या तब्येतीला देणार प्राधान्य

2026-04-01 08:49:29

Bhumi Pednekar Fitness: भूमी पेडणेकरचा मोठा निर्णय! आता भूमिकांपेक्षा स्वतःच्या तब्येतीला देणार प्राधान्य

Prajaktta Mali Video : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सर्वात मोठा निर्णय; दागिन्यांच्या ब्रँड बद्दल केली महत्वाची घोषणा

2026-03-31 18:12:18

Prajaktta Mali Video : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सर्वात मोठा निर्णय; दागिन्यांच्या ब्रँड बद्दल केली महत्वाची घोषणा

Kriti Sanon Cocktail 2: ‘कॉकटेल 2’मध्ये कृति सेननचा ग्लॅमरस यू-टर्न; नव्या ‘कूल’ अवतारात करणार चाहत्यांना सरप्राइज!

2026-03-30 11:50:19

Kriti Sanon Cocktail 2: ‘कॉकटेल 2’मध्ये कृति सेननचा ग्लॅमरस यू-टर्न; नव्या ‘कूल’ अवतारात करणार चाहत्यांना सरप्राइज!