TCS Q3 results: भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनीचा नफा 14 टक्क्यांनी घटला

TCS Q3 results: – भारतातील सर्वात मोठे सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी असलेल्या टीसीएस कंपनीने तिसर्या तिमाहीचा ताळेबंद सोमवारी जाहीर केला. जागतिक परिस्थिती खराब असल्यामुळे या कंपनीच्या नफ्यात या तिमाहित 14 टक्क्यांची घट होऊन या कंपनीला केवळ 10,657 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले.
या आकडेवारीचा मंगळवारच्या शेअर बाजार घडामोडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत टीसीएस कंपनीला 12,380 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर यावर्षी दुसर्या तिमाहीत या कंपनीला 12,075 कोटी रुपयाचा नफा झाला होता. म्हणजे वार्षिक आणि तिमाही पातळीवर या कंपनीच्या नफ्यात घट झाली असल्याचे दिसून येते.
या तिमाहीत कंपनीचा महसूल 4.86 टक्क्यांनी वाढून 67,087 कोटी रुपये इतका झाला आहे. म्हणजे महसुलात घट झालेली नाही. मात्र कर भरल्यानंतर कंपनीचा नफा कमी झाला असल्याचे दिसून येते.
या वर्षाच्या तिसर्यातील माहीत कंपनीचा कार्यचालन नफा 25.2% नी वाढला. गेल्या वर्षी या नफ्याचे प्रमाण 24.5% इतके होते. म्हणजे वार्षिक पातळीवर कार्यचालन नफ्यात वाढ झालेली आहे. कंपनीने कत्रीम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम वाढविले असून या क्षेत्रातील उलाढाल 17 टक्क्यांनी वाढून 1.8 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. या तिमाहीत कंपनीला 9.3 अब्ज डॉलरच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. बाजार बंद होण्या वेळी टीसीएस कंपनीच्या शेअरचा भाव शुक्रवारच्या तुलनेत 0.86 टक्क्यांनी वाढून 3,235 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ताळेबंद जाहीर केला आहे.
अमेरिकेने भारतीय सॉफ्टवेअर बाबत नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर भारतातील सॉफ्टवेअर कर्मचार्यांना अमेरिकेत जाण्यासाठी बर्याच अटी लावल्या आहेत. त्यामुळे भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्रावर परिणाम होईल असे समजले जात आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने हा ताळेबंद जाहीर केला आहे. लवकरच इतर सॉफ्टवेअर कंपन्या ताळेबंद जाहीर करणार आहेत.

