TCS Q3 Results: तिसर्या तिमाहीत टीसीएसचा नफा 12 टक्क्यांनी वाढला; प्रती शेअर 76 रुपयाचा लाभांश जाहीर

मुंबई – भारतातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या टीसीएसचा तिसर्या तिमाहीतील नफा 12 टक्क्यांनी वाढून 12,380 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत कंपनीला 11,058 कोटी रुपयांच नफा झाला होता. दुसर्या तिमाहीत कंपनीला 11,909 कोटी रुपयांचा नफा झाला होता असे कंपनीने शेअर बाजाराला कळविले आहे.
या तिमाहीत कंपनीचा महसूल 6.13 बैठकीत टक्क्यानी वाढून 65,206 कोटी रुपये झाला आहे. जो की गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत 61,445 कोटी रुपये होता. सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसर्या तिमाहीत कंपनीचा महसूल 64,988 कोटी रुपये होता. म्हणजे वार्षिक आणि तिमाही पातळीवर कंपनीच्या महसुलात वाढ झाली आहे. कंपनीचा खर्च 6.33 बैठकीत टक्क्यानी वाढून 48,550 कोटी रुपये झाला आहे. जो की गेल्या वर्षी या तिमाहीत 45,658 कोटी रुपये होता. ताळेबंद जाहीर होण्यापूर्वी कंपनीच्या शेअरचा भाव 1.72 टक्क्यांनी कमी होऊन 4,036 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता.
दरम्यान कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार या तिमाहीत कंपनीतील कामगारांची संख्या 5,000 ने कमी होऊन 6,07,354 इतकी झाली आहे. जागतिक परिस्थिती खराब आहे. विशेषतः अमेरिकेतील परिस्थिती खराब आहे. अशा परिस्थितीत भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या ताळेबंदावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र टीसीएस कंपनीच्या नफ्यावर आणि महसुलावर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. कंपनीने प्रति शेहर 76 रुपयाचा लाभांश जाहीर केला. त्यामध्ये 66 रुपयांच्या विशेष लाभांशाचा समावेश आहे.

