Tata Upcoming Cars 2023 – भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असेलेली मोटार वाहन निर्मिती कंपनी टाटा मोटर्स चालू वर्षात अनेक गाड्या लाँच करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टाटा मोटर्सच्या गाडयांना जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळतोय. आकर्षक रचना, उत्तम मायलेज, बैठक व्यवस्था ,आरामदायी आसनव्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुरक्षितता या वैशिष्ट्यांमुळे टाटाच्या गाड्या ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. भारतामध्ये तर ताटाच्या गाड्यांनी धूम मचावली आहे.
मागच्याच वर्षी 2022 मध्ये टाटा मोटर कंपनीने Tiago, Tigor CNG, Tiago ev तसेच Nexon EV Max या गाड्या लाँच केल्या होत्या. या गाडयांना उदंड प्रतिसाद मिळाला असून भारतीय बाजारात सर्वात खपाच्या गाड्यांच्या यादीत या गाड्यांचा समावेश आहे. चालू वर्षात देखील टाटा मोटर्स या गाड्यांची नवी मॉडेल्स बाजारात आणणार आहे. जाणून घेऊया Tata Upcoming Cars बाबत…
Tata Punch CNG । Tata Upcoming Cars 2023
टाटा मोटर्सने 2023 मध्ये टाटा पंच सीएनजी वेरिएंट नुकत्याच ग्रेटर नोएडा येते पार पडलेल्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित केली आहे. Tata Motors ने गतवर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये CNG विभागात प्रवेश करत Tata Tiago आणि Tigor CNG गाड्या लाँच केल्या होत्या. नवीन वर्षात लाँच होणारी Tata Punch CNG प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, एलईडी टेललाइट्स, 16-इंच ड्युअल-टोन अॅलॉय व्हील, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, रेन-सेन्सिंग वायपर्स, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रिअर पार्किंग कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स,दिवे यांचा समावेश आहे. Tata Punch CNG मोटर्समध्ये फीचर्स उपलब्ध आहेत.
Tata Punch EV । Tata Upcoming Cars 2023
ऑटो एक्सपो 2023 मोटर वाहनाच्या महामेळ्यात ही गाडी प्रदर्शित होईल अशी अपेक्षा होती मात्र कंपनीकडून Tata Punch CNG प्रदर्शित करण्यात आली. Tata Punch EV Alfa प्लेटफॉर्म वर आधारित असेल. Tata Punch EV निर्मितीसुद्धा Ziptron इलेक्ट्रिक मोटरकडूनच होणार आहे. टाटा पंच साधरणतः 90-100 hp शक्तिआणि 170-200 Nm एवढा टार्क जनरेट करू शकते. त्यामध्ये दोन बॅटरीचा ऑप्शन – मध्यम दीर्घकाळ या पर्यायत मिळेल.
Tata Altroz CNG | Tata Upcoming Cars 2023
पंच Cng गाडीबरोरच Tata Altroz CNG मोटर वाहन भारतीय रस्त्यावर धावताना अनेकदा दिसते
Tata Altroz CNG चे सीएनजी किट 1.2-लीटर पासून एस्पिरेटेड 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन बरोबर मिळून काम करते त्यामुळे वर्तमानात 86 बीएचपी पावर, आणि 113 एनएम चा पीक टॉर्क जनरेटकरते अल्ट्रोज़ सीएनजी ,आईएसओफिक्स चाइल्ड सीट एंकर, फ्रंटला डुअल एअरबॅग ,कॅमेरा , एबीएस , तसेच ईबीडी बरोबर रियर पार्किंग सेंसर अशा फीचर्ससह Tata Altroz CNG बाजारात उपलब्ध आहे.
Tata Harrier and Safari Red Dark Editions | Tata Upcoming Cars 2023
टाटा मोटर्स ऑटो एक्सपो 2023 मोटर वाहनाच्या महामेळ्यात Tata Harrier and Safari Red Dark Editions या गाड्या प्रदर्शित केल्या होत्या Tata Harrier and Safari Red Dark Editions स्टैंडर्ड मॉडलच्या तुलनेमध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. टाटा मोटर्स ची हि गाडी उंचपुरी असून लगेच ग्राहकांच्या मानपसंतीला उतरणारी आहे. फीचर्सचा विचार केल्यास Tata Harrier and Safari Red Dark Editions गाड्यांमध्ये , ADAS, रेड-सीट अपहोल्स्ट्री, हा एक नवीन 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम या मध्ये समाविष्ट केली आहे . एक नवीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि एक 360-डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स या मध्ये पाहायला मिळतात.
Tata Altroz Racer | Tata Upcoming Cars 2023
ऑटो एक्सपो 2023 मध्ये टाटा मोटर्स वाहन निर्मिती कंपनीने Altroz Racer हा Altroz चा स्पोर्टियर प्रकार प्रदर्शित केला. यात इलेक्ट्रिक सनरूफ, अद्ययावत डिजिटल इंस्ट्रुमेन्ट क्लस्टर आणि टाटा ची नवीनतम 10.25-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन ही वैशिष्ट्ये आहेत. Altroz Racer ला 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन हुड अंतर्गत मिळते, जे Tata Nexon प्रमाणेच आहे.