टाटाचा ‘कार’नामा! ‘या’ एसयूव्हीने एकाच वेळी ओढले तीन भलेमोठे ट्रक, व्हीडिओ व्हायरल

Tata Curve SUV : टाटा मोटर्सच्या कारला त्यांच्या मजबुतीसाठी ओळखले जाते. कंपनीच्या कारमध्ये प्रवाशांसाठी अनेक सुरक्षा फीचर्स देखील दिले जातात. कंपनीच्या कारच्या मजबुतीचे एक उदाहरण समोर आले आहे. कंपनीने गेल्यावर्षी लाँच केलेली एसयूव्ही Tata Curve ने एकाच वेळी तीन ट्रक ओढण्याची कामगिरी केली आहे.
टाटा मोटर्स कार्सने सोशल मीडियावर याचा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये टाटा कर्व एसयूव्ही एकाचवेळी 42000 किलो वजनाच्या तीन ट्रक्सला ओढताना दिसत आहे. यावरूनच टाटाच्या या एसयूव्हीची क्षमता लक्षात येते. तीन मोठ्या ट्रक्सला ओढतानाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Tata Curve SUV ची वैशिष्ट्ये काय आहेत व याच्या किंमतीविषयी जाणून घेऊयात.
Strength unleashed – Power that pulls beyond limits.#TataCURVV #CurvvPerformanceUnleashed #CURVVExperience #CURVV #SUVCoupe #ShapedForYou #TataMotors #TataMotorsPassengerVehicles pic.twitter.com/foPMoGzMRb
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) January 16, 2025
Tata Curve SUV मध्ये मिळेल पॉवरफुल इंजिन
Tata Curve SUV 3 इंजिन पर्यायासह येते. यात 1.21.2-लीटर GDI पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे 125bhp पॉवर आणि 225Nm पीक टॉर्क जनरेट करते. दूसरा 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 120bhp पॉवर आणि 170Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
या व्यतिरिक्त कारमध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन देखील देण्यात आले असून, जे 118bhp पॉवर आणि 260Nm पीक टॉर्क जनरेट करते. कारमध्ये ग्राहकांना मॅन्युअल आणि ऑटोमेटिक दोन्ही गियरबॉक्सचा पर्याय मिळतो.
टाटाच्या एसयूव्हीमध्ये मिळतील जबरदस्त फीचर्स
टाटा कर्वच्या कॅबिनमध्ये ग्राहकांना 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्राइड ऑटो अँड अॅपल कारप्ले कनेक्टिविटी, 10.25-इंच डिजिटल ड्रायवर डिस्प्ले, 9-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टम, एअर प्यूरीफायर, पॅनोरमिक सनरूफ, मल्टी कलर अँबिएंट लाइटिंग, वेंटीलेटेड फ्रंट सीट आणि वायरलेस फोन चार्जर देण्यात आले आहे.
कारमध्ये सुरक्षेसाठी 360 डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-2 ADAS टेक्नोलॉजी देखील दिली आहे. Tata Curve SUV ची किंमत 10 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. तर टॉप मॉडेलची किंमत 19 लाख रुपयांपर्यंत आहे.





