Tarique Rahman : बांगलादेशातील अल्पसंख्यांकाना समान हक्क, सुरक्षा; पंतप्रधान तारिक रहमान यांनी दिली ग्वाही
बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायाला समान हक्क मिळतील आणि कोणत्याही धर्माचे असले, तरी सर्व नागरिकांना समान सुरक्षा दिली जाईल, यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान (Tarique Rahman) यांनी म्हटले आहे.

Tarique Rahman : बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायाला समान हक्क मिळतील आणि कोणत्याही धर्माचे असले, तरी सर्व नागरिकांना समान सुरक्षा दिली जाईल, यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान (Tarique Rahman) यांनी म्हटले आहे.
सोमवारी सचिवालयातील आपल्या कार्यालयात हिंदू समाजाच्या नेत्यांशी रहमान यांनी या संदर्भात विचारविनिमय केला. त्यावेळी सरकार धर्माच्या आधारावर नव्हे, तर या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाला हक्क आणि सुरक्षा मिळेल (Tarique Rahman)यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या, विशेषतः हिंदू समुदायाच्या सुरक्षेविषयी चिंता निर्माण झाली आहे.
विशेषतः हिंदू आणि त्यांची प्रार्थनास्थळे व धार्मिक मेळाव्यांच्या संरक्षणाच्या गरजेच्या पार्श्वभूमीवर आले रहमान यांचे हे वक्तव्य आले आहे. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांचा सर्वात मोठा धार्मिक सण असलेल्या आगामी दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर देशभरात पोलिसांनी वाढवलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे आश्वासन दिले आहे.
बांगलादेशात २०२२ साली झालेल्या जनगणनेनुसार बांगलादेशच्या सुमारे १७ कोटी लोकसंख्येपैकी ८ टक्के (अंदाजे १.३ कोटी) हिंदू आहेत. मागील वर्षांमध्ये, धार्मिक उत्सवांदरम्यान हिंदू मंदिरे आणि आस्थापनांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे आणि जातीय हिंसाचार रोखण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आपले पंतप्रधान पद लोकांची सेवा करण्याची एक संधी असल्याचे आपण मानतो. लोकांची धार्मिक ओळख काहीही असली तरी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील, असेही रहमान (Tarique Rahman) यांनी म्हटले आहे.






