“टॅरिफ माझा प्रिय शब्द, जागतिक पातळीवर दबाव निर्माण…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

Donald Trump | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने धक्कादायक निर्णय घेत आहेत. त्यांच्या टॅरिफ हल्ल्यांनी जगाला धक्के दिले आहेत. मात्र टॅरिफ हे केवळ अमेरिकेची शक्ती दर्शवणारे नाही, तर जागतिक पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी एक प्रभावी साधन ठरल्याचे त्यांनी म्हंटले आहे. इतकेच काय तर त्यांनी आपल्या व्यापार धोरणाचेही समर्थन केले आहे. याशिवाय त्यांनी आठ युद्ध थांबवल्याचे उद्गार पुन्हा केले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “टॅरिफमुळे केवळ अमेरिकेची शक्तीच दिसली नाही, तर जागतिक दबाव निर्माण करण्यातही हे धोरण प्रभावी ठरलं. या दबावामुळे अनेकदा दोन देशांमधील युद्ध थांबवता आलं. मुळात टॅरिफ हा माझा आवडता शब्द आहे. माझ्या टॅरिफ धोरणामुळे या सगळ्याला खरं बळ मिळालं. टॅरिफ आता माझ्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य बनलं आहे.” माझे निर्णय व माझ्या धोरणांमुळे जगभरात बरीच उलथापालथ झाली. अनेक युद्ध थांबली, केवळ १० महिन्यांमध्ये मी आठ युद्ध संपुष्टात आणली.”
गाझामधील संघर्ष थांबवला
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या २०२६ च्या अजेंड्याबद्दल भाषण केलं. यावेळी ते म्हणाले, “आम्ही अमेरिकेला बळ दिलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला मजबूत स्थितीत नेलं. इराणपासून निर्माण झालेला अण्वस्रांचा धोका संपुष्टात आला आहे. आपण गाझामधील संघर्ष थांबवला. प्रदीर्घ काळानंतर आता तिथे शांतता आहे. दुसऱ्या बाजूला आपण ओलिसांची सुटकाही केली. हमासने अनेक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. आपण त्यांची मुक्तता सुनिश्चित केली.” Donald Trump |
वाढत्या महागाईबाबत चकार शब्द नाही
यावेळी त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. देशातील सद्यस्थिती, महागाई आणि इमिग्रेशन आदी समस्यांना गत सरकारच जबाबदार असून, आपण आता परिस्थिती सुधारण्याचे काम करत आहोत, असेही ते म्हणाले. मात्र सध्या अमेरिकेत वाढती महागाई व आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ झाल्याने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. असे असताना वाढत्या महागाईबाबत काहीही न बोलता त्यांनी केवळ टॅरिफचे कौतुक करण्यात धन्यता मानली आहे. Donald Trump |
हेही वाचा :





