पुणे – करोना व्हायरसचा संसर्ग कमी झाल्यानंतर आता अनेक चित्रपटांचे शूटिंग सुरू करण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने “रश्मी रॉकेट’चे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे. आता ती आपल्या आगामी “शाबाश मिट्ठू’ची जोरदार तयारी सुरू केली आहे.
View this post on Instagram
हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात तापसी पन्नू ही मिताली राजची भूमिका साकारत आहे. यासाठी तापसी विशेष ट्रेनिंग घेत असून याची एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात ती हातात बॅट घेऊन शॉट मारण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
या फोटोत तापसीने हॅण्डग्लोव्ह घालून चेंडूवर लक्ष्य केंद्रित करत एक मोठा शॉट खेळणार असल्याचे प्रतीत होत आहे. हा फोटो शेअर करत तापसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, चेंडू आणि बॅटसोबत रोमांस करण्यास सुरुवात झाली आहे. खूप लांबचा ठप्पा गाठायचा असून त्याची चांगली सुरुवात झाली आहे. तापसी म्हणाली, “आता निम्मे काम झाले असून हा प्रवास एक खूपच रोमांचक ठरणार आहे.
View this post on Instagram
भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजसाठी आणि त्यांच्या संघासाठी हे अनोखे गिफ्ट ठरणार आहे.’ तापसीचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर असंख्य कमेंटस् येत आहेत.
View this post on Instagram