Tanvi Kolte : बिग बॅास मराठी सिझन 6 चा बहुप्रतिक्षित महाअंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या सिझनमध्ये तन्वी कोलते हिने विजेतेपद पटकावले आणि ‘महाविजेती’चा बहुमान मिळवला. कलर्स मराठी या वाहिनीवरील या सिझनने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मने जिंकली होती. अंतिम क्षणापर्यंत विजेत्याबाबतची उत्कंठा कायम होती. विजेत्याची घोषणा होताच वातावरण जल्लोषात न्हाऊन निघाले. संपूर्ण सिझन तन्वी कोलतेने आपल्या स्पष्टवक्तेपणा, जिद्द आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर वेगळी छाप पाडली. प्रेक्षकांशी जुळलेलं नातं आणि ठाम भूमिका यामुळे तिने बिग बॅासच्या सहाव्या पर्वाच्या विजेत्या पदाची ट्राफी जिंकली आहे. ही ट्राफी जिंकल्यानंतर तन्वी कोलतेने आपली पहिली प्रतिक्रिया दिली. हा प्रवास तिच्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हीच तिची खरी ताकद असल्याचे सांगत तिने हा विजय आपल्या कुटुंबाला आणि समर्थकांना समर्पित केला. …तर एक ब्रँड म्हणून बाहेर पडतेय. “घरात मला नेहमी विचारलं जायचं की, तू काय केलंस? तेव्हा वाईट वाटायचं. पण बाहेर पडताना सगळ्यांच्या तोंडी माझंच नाव असेल, असं ठरवलं होतं. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केले आहे, तन्वी कोलते म्हणून बाहेर जात आहे ते तन्वी कोलते हा ब्रँड बनून”.अशी पहिली प्रतिक्रिया तिने दिली. या सिझनमध्ये स्पर्धकांनी 100 दिवस कॅमेरांच्या नजरकैदेत राहत मैत्री, वाद, भावना आणि संघर्षाचे अनेक रंग अनुभवता आले. या सिझनमध्येही प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. तन्वी कोलते बिग बॅासची विनर झाल्यानंतर तिला ट्राफीसह 15 लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. याशिवाय पीएन गाडगीळ अॅन्ड सन्स यांच्याकडून 10 लाख रुपयांचे वाउचर, रेवा डायमंड ज्वेलरी खरेदीची सुविधा आणि ‘तुनवाल ई मोटर्स’ कडून ‘लिथिनो प्रो’ ई-बाईकही देण्यात आली. कोण आहे तन्वी कोलते? तन्वी कोलते एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखली जाते. तिला इंस्टाग्रामवर रील्स, फॅशन, लाइफस्टाइल आणि रिलेटेबल व्हिडीओमुळे प्रसिद्ध मिळाली. तन्वीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर डिजिटल कंटेंट क्रिएशनकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिने छोटे व्हिडिओ आणि ट्रेंडिंग रील्स बनवून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर तिच्या एक्सप्रेसिव्ह स्टाइल आणि नैसर्गिक अभिनयामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. तिच्या असलेल्या फॉलोअर्सच्या संख्येमुळे अनेक ब्रँड्सने तिच्यासोबत कोलॅबोरेशन केलं. बिग बॅासमध्ये सहभागी झाली आणि… तन्वी कोलते बिग बॅासमध्ये सहभागी झाल्यानंतर दिलेल्या टास्कमध्ये तिचा अॅक्टिव्ह सहभाग दिसून आला. तसेच बेधडक स्वभावामुळे तिने बिग बॉसच्या घरात वेगळी ओळख निर्माण केली. तसेच इतर स्पर्धकांसोबत वाद आणि स्पष्ट भूमिका यामुळे ती कायम चर्चेत राहिली. तन्वी कोलते ही नव्या पिढीतील डिजिटल स्टार असून बिग बॉसच्या प्लॅटफॉर्ममुळे तिची लोकप्रियता आणखी वाढत आहे. हेही वाचा : Stone Pelting in Saswad : सासवड हादरले! मध्यरात्री दोन गटांत तुफान दगडफेक; पोलिसांवरही हल्ला, नक्की काय घडलं?