Tamil Nadu Election Results 2026 : मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह 31 मंत्री पिछाडीवर; थलपती विजयचा सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का
Tamil Nadu Election Results 2026 : कलांनुसार, थलपती विजय यांचा पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत

Tamil Nadu Election Results 2026 : तामिळनाडूच्या आकडेवारीत मोठा बदल बघायला मिळत आहे. अभिनेता थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष आता सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. टीव्हीके पक्ष द्रमुकच्या पुढे गेल्याचं सध्याचं चित्र आहे.
द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) यांच्याभोवती फिरणारे तामिळनाडूच्या राजकारणाला अभिनेता थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) या पक्षाने निवडणुकीत प्रस्थापितांची डोकेदुखी वाढवली आहे. (Tamil Nadu Election Results 2026 )
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री सध्या पिछाडीवर आहेत. सत्ताधारी द्रमुक सरकारमधील दिग्गज चेहरे आणि स्वतः मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तसेच त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन पिछाडीवर असल्याचे समजते.
सध्या टीव्हीके (TVK) १०० जागांवर आघाडी, अ. द्रमुक + भाजप आघाडी – ६५ जागांवर आघाडी, द्रमुक + काँग्रेस आघाडी – ५२ जागांवर आघाडी आणि इतर २ जागांवर आघाडीवर आहे. (Tamil Nadu Election Results 2026)
थलपती विजय यांची विजयाकडे धाव
एक्झिट पोलमध्ये ‘अॅक्सिस माय इंडिया’ने वर्तवलेला अंदाज खरा ठरत असून, थलपती विजय यांच्या TVK पक्षाने 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. त्यानुसार आता TVK पक्ष 118 बहुमताच्या आकड्याकडे धाव घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा एखादा पक्ष थेट सत्तेच्या जवळ पोहोचण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. (Tamil Nadu Election Results 2026)
दरम्यान, तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी मतदान झाले असून बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. सध्याचे कल पाहता थलपती विजय यांचा पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत दिसत आहे.
हेही वाचा:






