Election Results ECI 2026: देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीशी संबंधित प्राथमिक निवडणूक निकाल जाहीर केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष १०५ जागांवर आणि भाजप १२५ जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये भाजप ६८ जागांवर, तर काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये डावे पक्ष ५२ जागांवर आणि काँग्रेस ८३ जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये भाजप २२ जागांवर आणि काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये डीएमके ४६ जागांवर आणि एआयडीएमके ३० जागांवर आघाडीवर आहे. (Election Results ECI 2026) Election Results ECI 2026: निवडणूक आयोगाची पहिली अधिकृत माहिती ; जाणून घ्या बंगाल-आसामपासून केरळपर्यंत कोण आघाडीवर ? तर तिकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमध्येच पिछाडीवर आहेत. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी या ठिकाणी आघाडी घेतली आहे. सुवेंदू अधिकारी दोन्ही जागेवर आघाडीवर दिसत आहेत. भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही ठिकाणी सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. (Election Results ECI 2026) दरम्यान, तामिळनाडूमध्ये डीएमके ५९ जागांवर आघाडीवर आहे, त्याखालोखाल टीव्हीके १६ आणि एआयएडीएमके ३ जागांवर आहेत. तर भाजप आणि काँग्रेस या टप्प्यावर कोणत्याही जागेवर आघाडीवर नाहीत. इतर पक्ष ५ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत. (Election Results ECI 2026)