Tamil Nadu Politics : अण्णाद्रमुकचे आणखी 2 आमदार सोडणार साथ? बैठकीला होते गैरहजर
अण्णाद्रमुकचे प्रमुख इ.के.पलानीस्वामी यांनी मंगळवारी महत्वाची (Tamil Nadu Politics) बैठक घेतली. मात्र, त्या बैठकीपासून २ आमदार दूर राहिले.

Tamil Nadu Politics : अण्णाद्रमुकचे प्रमुख इ.के.पलानीस्वामी यांनी मंगळवारी महत्वाची (Tamil Nadu Politics) बैठक घेतली. मात्र, त्या बैठकीपासून २ आमदार दूर राहिले. त्यामुळे अण्णाद्रमुकची साथ सोडणाऱ्या आमदारांमध्ये त्यांचाही समावेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
के.सी.वीरमणी आणि एस.एम.सुकूमार या आमदारांनी पलानीस्वामींनी बोलावलेल्या बैठकीला (Tamil Nadu Politics) दांडी मारली. त्यामुळे अण्णाद्रमुकला लागलेले गळतीसत्र कायम राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. वीरमणी हे माजी मंत्री आहेत. ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी बैठकीपासून दूर राहण्याची घडामोड अण्णाद्रमुकची चिंता वाढवणारी आहे.
विधानसभा निवडणुकीतील पीछेहाटीनंतर तमिळनाडूतील महत्वाचा पक्ष असणाऱ्या अण्णाद्रमुकमधून आऊटगोईंग सुरू झाले आहे. आतापर्यंत ६ नेत्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन अण्णाद्रमुकला रामराम ठोकला. त्यांनी राज्य सरकारचे नेतृत्व करणाऱ्या टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अण्णाद्रमुकचे विधानसभेतील संख्याबळ घटून ४१ इतके झाले आहे.
आणखी काही आमदार त्या पक्षातून (Tamil Nadu Politics) बाहेर पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अशात २ आमदारांनी पक्षाची बैठक टाळल्याची घडामोड घडली. त्यामुळे अण्णाद्रमुकला आणखीही हादरे बसणार असल्याचे सूचित झाले.






