M. K.Stalin : टीव्हीके सरकार 3 महिनेही टिकणे अवघड; एम.के.स्टॅलिन यांनी वर्तवले भाकीत
तमिळनाडूत केवळ आमच्या आणि मित्रपक्षांच्या कृपेने टीव्हीके सत्तेत असल्याचा दावा करणारे द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन (M. K.Stalin) यांनी नवे भाकीत केले. टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील सरकार ३ महिनेही टिकणे अवघड असल्याचे त्यांनी म्हटले.

M. K.Stalin : तमिळनाडूत केवळ आमच्या आणि मित्रपक्षांच्या कृपेने टीव्हीके सत्तेत असल्याचा दावा करणारे द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन (M. K.Stalin) यांनी नवे भाकीत केले. टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील सरकार ३ महिनेही टिकणे अवघड असल्याचे त्यांनी म्हटले.
टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारवर मी सहा महिने टीका न करण्याचे ठरवले होते. तसे मी बोलूनही दाखवले. मात्र, आताचे सरकार ज्या प्रकारचे आहे; त्याविषयी अधिक बोलण्याची गरज नाही. अर्थात, लवकरच बोलावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
आताच अनेक जण नव्या सरकारवर टीका करत आहेत. प्रश्न सहा, पाच किंवा चार महिन्यांचा नाही. आताचे सरकार तीन महिने तरी टिकेल का असा प्रश्न पुढे आला आहे, असे स्टॅलिन (M. K.Stalin) रविवारी द्रमुकच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
त्यांनी शनिवारीच तमिळनाडूतील राजकीय घडामोडींविषयी महत्वाचा गौप्यस्फोट केला होता. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देण्याची परवानगी द्रमुकने मित्रपक्षांना दिली. त्यामागे राष्ट्रपती राजवट टाळण्याचा उद्देश होता, असे भाष्य त्यांनी केले होते.
दरम्यान, अण्णाद्रमुकचे प्रमुख इ.के.पलानीस्वामी यांनीही स्वतंत्रपणे बोलताना टीव्हीके सरकार फार काळ टिकण्याविषयी साशंकता व्यक्त केली. पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी तो काढून घेतल्यास सरकार केव्हाही कोसळेल, याकडे त्यांनी (M. K.Stalin)लक्ष वेधले.






