विषारी दारु प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू; 60 हून अधिक जणांवर उपचार सुरू

Tamil Nadu | तामिळनाडूतील कल्लाकुरीची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी 19 जून रोजी रात्री ही घटना घडली असून यात 60 हून अधिक जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी याबाबत माहिती दिली आहे.याप्रकरणी 49 वर्षीय के. कन्नुकुट्टी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 200 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली दारू चाचणीसाठी पाठवली असता त्यामध्ये प्राणघातक मिथेन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवारी रात्री मोठ्या संख्येने रुग्ण उलट्या आणि इतर तक्रारींसाठी कल्लाकुरीची रुग्णालयात तसेच विल्लुपुरम, सालेम आणि पुदुच्चेरी या भागातील रुग्णालयांमध्येही दाखल झाले. या रुग्णांची तपासणी केली असता त्यांनी विषारी दारू प्यायल्यामुळे त्यांना हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज रुग्णालयाकडून व प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. Tamil Nadu |
Tamil Nadu CM tweets, “I was shocked and saddened to hear the news of the deaths of people who had consumed adulterated liquor in Kallakurichi. Those involved in the crime have been arrested in this matter. Action has also been taken against the officials who failed to prevent…
— ANI (@ANI) June 19, 2024
एमके स्टॅलिन यांचे ट्वीट
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, “कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दु:ख झालं आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच अटक रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.”
ते पुढे बोलताना म्हणाले की, “अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची माहिती जनतेनं दिल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. समाजाला नुकसान पोहचवणाऱ्या अशा गुन्ह्यांना कठोरपणे आळा घालण्यात येईल,” असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. Tamil Nadu |
हेही वाचा:





