Tamannaah Bhatia Case: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला मद्रास हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. १ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईशी संबंधित तिची अपील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यापूर्वी सिंगल जजने दिलेला निर्णय योग्य असल्याचं मान्य करत, डिव्हिजन बेंचनेही तोच निकाल कायम ठेवला. Tamannaah Bhatia Case हा संपूर्ण वाद 2008 मध्ये झालेल्या एका जाहिरात कराराशी संबंधित आहे. त्या वेळी तमन्ना भाटियाने ‘पॉवर सोप्स लिमिटेड’ या कंपनीसोबत एक वर्षाचा करार केला होता. या करारानुसार, तिने कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात करायची होती. हा करार 6 ऑक्टोबर 2009 पर्यंत वैध होता. मात्र, तमन्नाचा आरोप आहे की करार संपल्यानंतरही कंपनीने तिच्या चेहऱ्याचा वापर त्यांच्या साबणाच्या पॅकेजिंगवर सुरूच ठेवला. तिच्या मते, नोव्हेंबर 2010 ते फेब्रुवारी 2011 दरम्यान बाजारात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवर तिचे फोटो वापरण्यात आले, जे कराराचा भंग होता. (Tamannaah Bhatia Case) Tamannaah Bhatia Case: तमन्ना भाटियाला मद्रास हायकोर्टात धक्का; १ कोटींच्या नुकसानभरपाईची अपील फेटाळली या प्रकरणी तमन्नाने संबंधित कंपनी आणि तिच्या जाहिरात एजन्सीला जानेवारी आणि फेब्रुवारी 2011 मध्ये कायदेशीर नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे अखेर तिने न्यायालयात धाव घेत १ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली. या प्रकरणावर आधीच सिंगल जजने तमन्नाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर तिने डिव्हिजन बेंचकडे अपील दाखल केलं. मात्र, तिथेही न्यायालयाने सिंगल जजचा निर्णय योग्य असल्याचं सांगत तिची अपील फेटाळून लावली. न्यायालयाच्या निर्णयामागील सविस्तर कारणं अद्याप समोर आलेली नसली, तरी तमन्नाचे दावे पुरेसे ठोस नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (Tamannaah Bhatia Case) या कायदेशीर लढाईत तमन्नाला दिलासा मिळाला नसला, तरी तिच्या करिअरवर त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. ती सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. लवकरच ती ‘वन’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा सोबत झळकणार आहे. याशिवाय तिच्याकडे आणखी अनेक मोठे प्रोजेक्ट्सही आहेत. आता पुढे तमन्ना भाटिया सुप्रीम कोर्टात जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, सध्या तरी मद्रास हायकोर्टाच्या या निर्णयामुळे या दीर्घकालीन वादाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.