तमन्ना भाटिया प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहचली; टीमसह ‘ओडेला २’चा टीझर केला रिलीज

Tamannaah Bhatia | अभिनेत्री तमन्ना भाटियाने प्रयागराजमधील महाकुंभ मेळयात हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या आगामी ‘ओडेला २’ चा टीझर देखील प्रदर्शित केला. तमन्ना तिच्या चित्रपटाच्या टीमसह महाकुंभ मेळ्यात सहभागी झाली होती.
तमन्ना भाटियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून ‘ओडेला २’ च्या टीझरच्या रिलीजची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करून लिहिले की, ‘जेव्हा सैतान परत येतो, तेव्हा दैवी शक्ती त्याच्या भूमीचे आणि त्याच्या वारशाचे रक्षण करण्यासाठी पुढे येते’.
अद्याप या चित्रपटाची रिलीजची डेट जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु चाहते या चित्रपटाची रिलीज डेट जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये, तमन्नाच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटातील तिचा लूक समोर आला. ज्यात ती एका नागा साधूची भूमिका साकारत असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
‘ओडेला २’ हा चित्रपट २०२१ मध्ये आलेल्या ‘ओडेला रेल्वे स्टेशन’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित सिक्वेल आहे. अशोक तेजा दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची कथा एका गावाभोवती केंद्रित आहे. यात ओडेला मल्लन्ना स्वामी नेहमीच त्यांच्या गावाचे वाईट शक्तींपासून रक्षण करतात. या चित्रपटासाठी तमन्ना खूप मेहनत घेतली आहे.
हेही वाचा:





