Satara | कराड-उत्तरच्या आमदारांचा टॉक टाईम फक्त दोन महिने बाकी

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – कराड उत्तरच्या विद्यमान आमदारांनी सहकाराच्या नावाखाली लोकांना झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. जनतेच्या विकासापेक्षा स्वतःचा विकास साधला असून जनता आता निष्क्रिय आमदारांची घराणेशाही मोडून काढेल त्यांचा टॉक टाईम फक्त दोनच महिने बाकी असून कराड उत्तरची जनता नक्कीच परिवर्तन घडवून आणेल असा ठाम विश्वास भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.
कराड उत्तर मतदारसंघात भाजपाच्या वतीने परिवर्तन यात्रा काढण्यात आली असून कराड तालुक्यातील गायकवाडवाडी,घोलपवाडी, निगडी, हणबरवाडी,वाण्याची वाडी, कांबिरवाडी,मसूर, वाघेश्वर,
यादववाडी,माळवाडी,चिखली, किवळे या गावांमध्ये यावेळी परिवर्तन यात्रा काढण्यात यावेळी महायुती सरकारने मतदारसंघात केलेल्या कामांचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यात आले.
भाजपचे सातारा जिल्ह्याध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकर शेजवळ, कराड उत्तर महिला मोर्चा अध्यक्षा सीमाताई घार्गे, महेश जाधव, सुनील शिंदे, सागर शिवदास, कराड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण,दिपाली खोत,नवीन जगदाळे,तुकाराम नलवडे, जितेंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना धैर्यशील कदम म्हणाले,कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनता विद्यमान आमदारांच्या घराणेशाहीला कंटाळली आहे आमदार मीच,साखर कारखान्याचा चेअरमन पण मीच,नगरपालिका,
बँकेत, शिक्षण संस्थेत पदावर माझेच भाऊ,पुतण्या नगरसेवक सगळीकडे मी आणि माझे कुटुंबीय पुढील निवडणुकीसाठी आमदारकीसाठी आतापासूनच मुलाची तयारी सगळीकडे मी आणि माझेच कुटुंबीय हे असे किती दिवस चालणार सत्ता स्थानांना धरून बसलेल्यांना उचलून फेकण्याची वेळ आली आहे
नाकर्त्या आमदारांना परत संधी देण्याचे षडयंत्र रचले जात असून स्वाभिमानी कराड उत्तरची जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या पिढीच्या उद्याच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीला साथ द्या असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या माध्यमातून राबविलेल्या विकास कामांची माहिती वेगवेगळ्या गावांमध्ये आयोजित बैठकींमध्ये दिली परिवर्तन यात्रेत शहाजी मोहिते,युवराज गायकवाड,सतीश गायकवाड, सागर गायकवाड, महेश पवार, शशिकांत घोलप, संदीप गायकवाड, अर्जुन घोलप,
युवराज गायकवाड,सयाजी गायकवाड,मारुती घोलप, प्रशांत घोलप,शंकर जाधव, संदीप पवार,मंगेश शेडगे, रघुनाथ शेडगे,तुषार शेडगे, प्रकाश पवार,शहाजी देसाई, बिपिन जगदाळे, सुमित शहा,
कल्पेश बोराटे, रमेश मोरे,विक्रम विजापूरे,धीरज जाधव सरपंच, सूर्यकांत कांबीरे,अमोल कांबळे यांचेसह कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध गावचे ग्रामस्थ सहभागी झाले होते.





