Vijay and Tamannaah : विस्कटलेली घडी पुन्हा बसल्याची चर्चा! विजय आणि तमन्नाचा एकत्रित व्हिडिओ समोर, चाहत्यांकडून आनंद व्यक्त
Vijay and Tamannaah : पुन्हा एकदा दोघेही चर्चेत आले आहेत. याला कारण ठरलाय तो सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ. या व्हिडिओतून दोघांचे सूत पुन्हा जुळले असून त्यांचे पॅचअप झाल्याचे म्हटले जात आहे.

Vijay and Tamannaah : बॅालिवूड अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया हे दोघेही एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत होते. मात्र, 2025 मध्ये त्यांनी नात्याचा शेवट करत एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा दोघेही चर्चेत आले आहेत. याला कारण ठरलाय तो सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ. या व्हिडिओतून दोघांचे सूत पुन्हा जुळले असून त्यांचे पॅचअप झाल्याचे म्हटले जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकत्र दिसत आहेत. दोघेही हातात हात घालून चालताना दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. दोघेही चालत असताना एक गाडी समोर येते. या गाडीत दोघेही बसतात आणि निघून जातात. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये दोघे पुन्हा एकत्र आले आहेत का, असा सवाल विचारला जात आहे. मात्र, या चर्चांवर विजय किंवा तमन्नाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
View this post on Instagram
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी दोघांच्या पुनर्मिलनाबाबत उत्सुकता व्यक्त केली, तर अनेकांनी ते पुन्हा एकत्र आले असतील तर आनंदच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. काही चाहत्यांनी हार्ट आणि लव्ह इमोजीद्वारेही आपली भावना व्यक्त केली. विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांनी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केले होते.
हेही वाचा : Toxic Release Date : यशच्या ‘टॉक्सिक’ची रिलीज डेट जाहीर; डबल रोलची झलक समोर
मात्र, मार्च 2025 मध्ये त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या विभक्त होण्यामागील नेमके कारण मात्र कधीच उघड झाले नाही. अशातच ब्रेकअपनंतर दोघे एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विजय एका ‘मिस्ट्री गर्ल’सोबत देखील स्पॅाट झाला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर विजयला आलिया कुरैशीसोबत पाहण्यात आले. दोघेही एकत्र वेळ घालवत असल्याचे दिसून आले, त्यामुळे सोशल मीडियावर लगेचच त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली.
विजय वर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो ‘मटका किंग’ या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसला. या सिरीजला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी आणि विजयच्या चाहत्यांनी दिला. त्याच्यासोबत या सिरीजमधील अनेक कलाकारांचा अभिनय लक्ष वेधून घेणारा आहे. वेबसिरीजची कथा 1960 च्या दशकातील मुंबईवर आधारित असून मटका जुगाराच्या पार्श्वभूमीवर उभी आहे.





