तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीवर एकूण १८९१ हरकती दाखल झाल्या आहेत. यापैकी ९२२ हरकतींसाठी पुरावे प्राप्त झाले नसल्याने, प्रत्यक्ष क्षेत्रनिहाय तपासणी करून अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती व आक्षेप नोंदविण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत होती. या कालावधीत नागरिकांकडून १८९१ हरकती प्राप्त झाल्या. प्रशासनाकडून त्यांची तपासणी केल्यानंतर पुरावे नसलेल्या हरकतींसाठी संबंधित भागात प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत १४ प्रभाग असून, एकूण २८ नगरसेवक निवडून येणार आहेत. प्रभागनिहाय हरकतींचा तपशील पुढीलप्रमाणे आहेत – प्रभाग क्रमांक – हरकती प्राप्त – पुरावे नसलेल्या १ ५७ २९ २ १०४ ६४ ३ १७९ १४५ ४ ६६ ३४ ५ ४५ २२ ६ २३० ८० ७ २११ १५ ८ ७७ ३४ ९ १२९ ४५ १० ९३ ५८ ११ ३३४ १५४ १२ २०२ १५९ १३ ८० ३३ १४ ८४ ५०