नगर | तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत टाकळीभान संघ विजेता
Updated On:

टाकळीभान, (वार्ताहर) – तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा टाकळीभान संघ (लहान गट) फायनलमध्ये विजयी ठरला. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. श्रीरामपूर येथील बोरावके काॅलेजमध्ये नुकत्याच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत टाकळीभान जि.प.प्राथमिक शाळा कबड्डी संघाने उत्कृष्ठ खेळ करत फायनल जिंकली आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत या संघाने आपले स्थान निश्चित केले आहे. या खेळाडूंना मुख्याध्यापक अनिल कडू, कुमार कानडे, शिवाजी पटारे आदी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विजयी संघाचे शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, टाकळीभान ग्रामस्थ व कबड्डी प्रेमींकडून अभिनंदन केले जात आहे.





