स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका बॅलटवर घ्या; बीडमध्ये वकिलांचा ‘लोकशाही बचाव मोर्चा’
Updated On:

बीड – ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपर लाओ, लोकशाही बचावो अशा घोषणा देत गुरुवारी दुपारी दीड वाजता बीड शहरातील वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही बचाव मोर्चा काढला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपवर घेण्याची मागणी मोर्चकरी वकिलांनी केली. यावेळी वकीलांनी हाती फलक घेतले होते. जर लोकशाही आणि संविधान टिकायचे असेल तर आम्ही सर्व कायद्याचे रक्षक म्हणून मतदान बॅलेट पेपरवर झाले पाहीजे.
भाजपला एवढाच जनाधारावर विश्वास आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका बॅलेट पेपवर घ्याव्यात अशी मागणी अँड. हेमा पिंपळे यांनी केली.





