करोनाला गांभीर्याने घ्या; फेसमास्क परिधान करा – मोदी
Updated On:

नवी दिल्ली – करोना विषाणूला गांभीर्याने घ्या. फेसमास्क परिधान करण्याच्या आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले.
सुरक्षित आणि स्वस्थ राहा. कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांची काळजी घ्या. त्या बाबी महत्त्वाच्या आहेत. करोनाला हलक्याने घेऊ नका.
शास्त्रज्ञ जोपर्यंत करोनावरील लस विकसित करत नाहीत; तोपर्यंत सामाजिक लसच आपला बचाव करण्याचा सर्वोत्तम आणि एकमेव पर्याय आहे, असे मोदींनी म्हटले. सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी करोना संकटाबाबत जनतेला पुन्हा सावध केले.





