बिग बिलियन सेलचा घ्या फायदा ! अर्ध्या किंमतीत मिळतोय ‘Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro’फोन; जबरदस्त फीचर्स एकदा पाहा….

Google Pixel 8 | Pixel 8 Pro : सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे, ॲमेझॉनप्रमाणेच ई-कॉमर्स साइट आणि फ्लिपकार्टने बिग बिलियन सेल सुरु केला आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये अनेक उत्पादनांवर उत्तम सूट देण्यात येत आहे, ज्यामध्ये तुम्ही Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro फोन चांगल्या किंमतीत खरेदी करू शकता.
‘Google Pixel 8’वर सूट :
Google ने गेल्या वर्षी Pixel 8 फोन लॉन्च केला होता, जेव्हा या फोनची किंमत 75,999 रुपये होती. Flipkart च्या बिग बिलियन डे सेलमध्ये, तुम्ही Pixel 8 फोन अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता म्हणजेच 50 टक्के सूट फक्त 37,999 रुपयांमध्ये.
‘Google Pixel 8 Pro’वर सवलत :
बिग बिलियन डे सेलमध्ये Google Pixel 8 Pro फोनवरही सूट दिली जात आहे, परंतु ही सूट Pixel 8 सारखी नाही. Pixel 8 Pro फोन Google ने Rs 1,06,999 मध्ये लॉन्च केला होता, जो तुम्ही सध्या फक्त Rs 86,999 मध्ये 18 टक्के सूट देऊन खरेदी करू शकता.
Google Pixel 8 वैशिष्ट्यांबद्दल जाऊन घ्या :
Google Pixel 8 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.2 इंच फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. याशिवाय गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन देण्यात आले आहे. स्मार्टफोनची कमाल ब्राइटनेस 2,000 nits पर्यंत आहे. यात 8GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.
Google Pixel 8: चिपसेट आणि कॅमेरा :
यामध्ये Tensor G3 चिपसेट आणि Titan M2 coprocessor चा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. हा फोन Android 14 OS वर चालतो आणि सॉफ्टवेअर अपडेट 7 वर्षांसाठी उपलब्ध असतील. या स्मार्टफोनमध्ये 27W फास्ट चार्जिंगसह 4,575mAh बॅटरीचा सपोर्ट आहे.
Pixel 8 मध्ये 50MP मुख्य कॅमेरा असेल, जो OIS सह येतो. याशिवाय 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 10.5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.





