पिंपरी | बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा
Updated On:

पिंपरी,(प्रतिनिधी)- ओव्हरलोड डंपर मुरम, खडी, स्टील, खडी वाहतूक करणारे तसेच बेकायदेशीर ट्रॅव्हल्स सर्रासपणे शहरात वाहतूक करीत आहेत. त्यामुळे दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालक व सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अशा बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शिव वाहतूक सेनेने केली आहे.
याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरटीओ फिटनेस नसलेल्या ट्रॅव्हल्स गाड्या सर्रास वाहतूक करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. तसेच अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक होत आहे. अशा बेकादेशीर वाहनांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. असे निवेदनात नमुद केले आहे.

