तैवान घडामोडीचा भारतावर परिणाम नाही – RBI गव्हर्नर शक्तीकांत दास

मुंबई – तैवानवर चीनने पुन्हा दावा केला आहे. त्यावरून चीन आणि अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र या परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसलाही परिणाम होणार नाही असाच दावा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केला आहे.
ते म्हणाले की, भारत आणि तैवांचा व्यापार एकूण व्यापाराच्या केवळ 0.7 टक्के आहे. त्याचबरोबर तैवानमधून भारतात होणारी गुंतवणूक फार कमी आहे. तैवानमध्ये ज्या घडामोडी घडल्या आहेत किंवा भविष्यामध्ये जर काही घडामोडी घडल्या तरीही त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
श्रीलंकेतील आर्थिक पेच प्रसंगाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की या संदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आवश्यक त्या उपाययोजना आणि चर्चा करीत आहे. रिझर्व्ह बॅंक फक्त अर्धव्यवस्थेवरील परिणामाबाबत विचार करीत असते असे ते म्हणाले.





