Asian Taekwondo Poomsae championship 2024 : रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक…

8th Asian Taekwondo Poomsae championship in Vietnam – भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षक अभिषेक दुबे यांच्या सर्वोत्तम प्रशिक्षणातून रूपा बायोरने व्हिएतनाम येथे ऐतिहासिक पदकाचा बहुमान पटकावला. अरुणाचल प्रदेश येथील या युवा खेळाडूने पुमसे या सर्वांत आव्हानात्मक गटात भारताला कांस्यपदकचा बहुमान मिळवून दिला आहे.
पहिल्यांदाच भारताने या स्पर्धेमध्ये पदकाचा बहुमान पटकावला. व्हिएतनाम येथे ही स्पर्धा १४ ते १८ मे या कालावधीत पार पडली. आशियाई पुमसे ही आठवी तर क्युरोगी ही २६वी स्पर्धा आहे.
3-star Grand Prix Event 2024 | घोडेस्वार श्रुती व्होराची ऐतिहासिक विजयाची नोंद…
कांस्य पदक जिंकल्यानंतर बोलताना बायोर म्हणाली, ऐतिहासिक पदक जिंकल्याचा मला अभिमान आहे. या कांस्यपदकामुळे संघाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला पदक मिळवून देण्याची स्वप्नपूर्ती झाल्याचा मला मोठा आनंद झाला, असेही ती म्हणाली.





