satara | तडीपार युवकाला जवळे येथे अटक
Updated On:

खंडाळा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असतानाही जवळे, ता. खंडाळा येथे वावरत असलेल्या सोमनाथ जयसिंग भोसले (वय 24, रा. जवळे) यास खंडाळा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी, सोमनाथ भोसले याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून, तो शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास जवळे येथील एका दुकानाच्या आडोशाला संशयितरित्या आढळून आला. पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक फौजदार वरे व पोलीस अंमलदार दिग्विजय पोळ यांनी त्याला शिताफीने पकडले.
याबाबत दिग्विजय पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार वरे तपास करत आहेत.





