Actress Tabu : ‘मला पुरुषाची फक्त बेडवर…’, अभिनेत्री तब्बूबाबतचे धक्कादायक विधान पुन्हा चर्चेत; व्हायरल दाव्यामागील सत्य काय?

Tabu Shocking Statement: बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री तब्बू सध्या तिच्या ‘दे दे प्यार दे २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ५४ व्या वर्षात पदार्पण केलेल्या तब्बूने अद्याप लग्न केलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या तिच्या लग्नाशी संबंधित एक जुने विधान प्रचंड व्हायरल होत असून, त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. परंतु, या विधानामागील सत्य आता समोर आले आहे.
काय आहे व्हायरल पोस्ट?
गेल्या काही तासांपासून ‘एक्स’ (ट्विटर) आणि इंस्टाग्रामवर तब्बूच्या नावाचा एक फोटो आणि विधान शेअर केले जात आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, तब्बूने तिच्या वैयक्तिक गरजा आणि लग्नाबाबत अत्यंत बोल्ड वक्तव्य केले आहे. “मला एका पुरुषाची फक्त बेडवर साथ हवी आहे, मी लग्न करणार नाही; मी सध्या माझे सिंगल आयुष्य एन्जॉय करत आहे,” अशा आशयाचे विधान तब्बूने केल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
व्हायरल दाव्याचे सत्य काय?
सोशल मीडियावर हे विधान वाऱ्यासारखे पसरल्यानंतर चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. मात्र, सखोल चौकशीअंती हे विधान पूर्णपणे खोटे (Fake) असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विचानाचे पुरावे नाहीत: तब्बूने असे विधान केल्याचा कोणताही व्हिडिओ किंवा अधिकृत मुलाखत उपलब्ध नाही.
टीमचा खुलासा: तब्बूच्या निकटवर्तीयांनी आणि तिच्या टीमने हे वृत्त फेटाळून लावले असून असे कोणतेही वक्तव्य तिने केलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जुनाच प्रकार: २०२५ मध्येही अशाच प्रकारची एक फेक पोस्ट व्हायरल झाली होती. खोडसाळपणे अभिनेत्रीच्या नावाचा वापर करून ही पोस्ट तयार करण्यात आली होती.
“Not interested in marriage and only wants a man to sleep in bed with.”
–#TabuEverything was fine until she commented this-
“while men might be essential in some contexts, such as lifting heavy furniture, they are not indispensable in life itself.” pic.twitter.com/WNKdW88t9L— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) January 18, 2025
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
तब्बू ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिने अनेकदा आपल्या सिंगल असण्यावर भाष्य केले आहे, परंतु व्हायरल होत असलेल्या अश्लील किंवा बोल्ड विधानांशी तिचा कोणताही संबंध नाही. नेटिझन्सनी अशा फेक पोस्टवर विश्वास ठेवू नये आणि त्या शेअर करू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
तब्बू सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून ५४ व्या वर्षीही ती ग्लॅमरस आणि सक्रिय आहे. तिने नेहमीच आपल्या कामातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.


