Actress Tabu : अभिनेत्री तब्बू बॅालिवूड इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ९० च्या दशकात अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली. आजही ती चित्रपटसृष्टीत सक्रीय असून, सतत आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसते. तब्बू ५४ वर्षांची झाली असून तरीही तिचा अभिनय तितकाच सहज आणि सुंदर असतो. तिची प्रत्येक चित्रपटातील भूमिका लक्षवेधक असते. तब्बूने लग्न का केले नाही याबाबत तिने अनेक मुलाखतींमध्ये स्पष्टपणे कारण सांगितले आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत तब्बूने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना एक कडू आठवण सांगितली आहे. तब्बू ३ वर्षांची असताना तिच्या आई वडीलांनी घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री याविषयी बोलताना म्हणाली, तिच्या जन्मदात्या वडीलांनी ती कधीही भेटली नाही आणि त्यांच्याशी असलेल्या तिच्या नात्याचा कधीही तिने उल्लेख केला नाही, जो तिच्या मते घटस्फोटानंतर संपला. अभिनेत्री तब्बूने अनेक चित्रपटांत काम केले असून, तिचे चाहते नेहमी तिच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत असतात. बालपणाविषयी तब्बू म्हणाली… “माझे बालपण खूप छान गेले. आम्ही अनेक वर्ष हैदराबादमध्ये राहिलो. माझ्या आई वडीलांच्या घटस्फोटानंतर मी माझ्या आजी-आजोबांसोबत राहत होते. माझी आई शिक्षिका होती, म्हणून मी माझा बहुतेक वेळ तिच्या आईसोबत घालवत असे. माझी आजी प्रार्थना करायची आणि पुस्तके वाचायची आणि मी त्याच वातावरणात वाढले. मी खूप लाजाळू होते. अशी आठवण तब्बूने सांगितली. तब्बू अनेकदा तिच्या फोटोशूटमुळे देखील चर्चेत असते. दरम्यान, तब्बूच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार कलाकार विजय सेतूपतीच्या आगामी चित्रपटात तब्बू झळकणार आहे. याशिवाय तब्बू दिग्दर्शक प्रियदर्शनचा अक्षय कुमारसोबताच्या ‘भूत बांगला’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचाही भाग असणार आहे. हेही वाचा : Satara News : ‘विकास कामात कुणीही कमी पडणार नाही ‘; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही