Taapsee Pannu: “चित्रपटात आई-वडिलांचा विरोध, जात-धर्मातील फरक यावर आधारित प्रेमकथा…”; तापसी पन्नूने मांडली भूमिका
Taapsee Pannu: प्रेमकथेवर आधारित आजच्या चित्रपटांबाबत तापसीने व्यक्त केली खंत

Taapsee Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू अभिनयासह तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. ९० च्या दशकातील चित्रपट पाहत मोठी झालेल्या तापसीला बॉलिवूडच्या मूळ रोम-कॉम चित्रपटांची उणीव जाणवत आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटांनी त्या काळात वेगळी प्रेमकथा समोर आणली होती. मात्र आता नव्या बदलाबाबत तापसी पन्नूने आपले मत व्यक्त केले आहे.
चित्रपटांमधील आई-वडिलांचा विरोध, जात-धर्मातील फरक अशा गोष्टींवर आधारित प्रेमकथा आता बदलायला हव्यात. सध्या स्वतःच्या दिसण्याला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे तापसीने नमूद केले आहे.
जुन्या रोमँटिक चित्रपटांमध्ये दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेल्याचे पडद्यावर दिसायचे. मात्र, आता कलाकार आपल्या लूककडे, कॅमेरा अँगल्सकडे आणि पडद्यावर आपण कसे दिसतोय याकडे अधिक लक्ष देतात.
प्रत्येक प्रेमकथेत गडद वळण किंवा सामाजिक संदेश असण्याची गरज नाही. कधी कधी केवळ प्रेमाचा अनुभव मांडणारी कथाही प्रेक्षकांना भावू शकते, असे तिचे मत आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मनमर्जियाँ’ या चित्रपटाचा तिने विशेष उल्लेख केला.
आजच्या चित्रपटांमध्ये प्रेम व्यक्त करताना दोन टोकं पाहायला मिळतात. एकीकडे मुलीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवणारा हिरो असतो, तर दुसरीकडे टॉक्सिक वागणूक देणारी पात्रं दिसतात. मात्र, या दोन्हींच्या मधला खऱ्या प्रेमाचा आणि एकमेकांसाठी प्रयत्न करण्याचा गोडवा हरवत चालल्याची खंत तापसीने व्यक्त केली.
हेही वाचा :
Uddhav Thackeray : ‘अजित पवारांच्या पुतळ्यासमोर बसून..’; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर घणाघात





