#T20WorldCup | भारताचा नामिबियावर 9 गडी राखून विजय

या सामन्यात विराट कोहली अखेरच्या वेळी भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व करत होता. या सामन्यातील विजयाने त्याच्या टी-20 संघाच्या नेतृत्वातील सामन्यात भारताने विजय मिळवला व स्पर्धेचा शेवट गोड केला.
रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या 56 धावांच्या खेळीत 37 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार फटकावले.
नामिबियाचे सलामीवीर स्टीफन बार्ड आणि मायकेल व्हॅन लिंजेन यांनी 33 धावांची सलामी दिली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने लिंजेनला 14 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या क्रेग विल्यम्सला रवींद्र जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जडेजाने सलामीवीर बार्डला 21 धावांवर पायचीत केले. यानंतर जडेजा व अश्विनने नामिबियाला आपल्या फिरकी गोलंदाजीच्या तालावर नाचवले.
यंदाच्या स्पर्धेत भरात असलेला अनुभवी फलंदाज डेव्हिड वीसेने एकाकी लढत देताना 26 धावांची खेळी केली. तळात जेन फ्रेलिंकने नाबाद 15 तर, रुबेन ट्रम्पलमनने नाबाद 13 धावा केल्या त्यामुळे त्यांना शतकी धावसंख्या उभारता आली. नामिबियाने 20 षटकात 8 बाद 132 धावा केल्या. भारताकडून जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी 3 तर, बुमराहने 2 बळी घेतले.





