T20 WorldCup – न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ फेरीच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला. विजयासाठी २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. डेव्हिड वॉर्नर (५) स्वस्तात बाद झाला. यानंतर कांगारूंचे गडी ठराविक अंतराने बाद होत गेले. एकानंतर एक गडी बाद झाल्याने आवश्यक असलेल्या धावांची गती कमी झाली. मधल्या फळीतील ग्लेन मॅक्सवेल (२८) आणि खालच्या फळीतील पॅट कमिन्स (२१) यांनी थोड्याफार धावा काढल्या.
टीम इंडियाने ‘या’ पाच चुका सुधारल्यास टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी जिंकण्याची मोठी संधी
मात्र धावांचे लक्ष्य इतके मोठे होते की कांगारूंच्या फलंदाजांना डावाला सावरता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १७.१ षटकात केवळ १११ धावाच करू शकला. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत टिम साऊदी आणि मिचेल सॅन्टनरने प्रत्येकी ३ तर बोल्टने २ गडी बाद केले. त्याचबरोबर लॉकी फर्ग्युसन आणि ईश सोढीला प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश मिळाले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३ गड्यांच्या मोबदल्यात २०० धावांचे डोंगराएवढे लक्ष्य उभारले.
सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने ५८ चेंडूत शानदार ९८ धावा केल्या. सलामीवीर फिन ऍलनने ताबडतोड फलंदाजी करताना अवघ्या १६ चेंडूत ४२ धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडने २ आणि अॅडम झाम्पाने १ गडी बाद केला.
New Zealand win their first men’s international game on Australian soil since 2011 🔥#T20WorldCup | #AUSvNZ | 📝 Scorecard: https://t.co/ouB6f5vSvG pic.twitter.com/gcCoihn9UD
— ICC (@ICC) October 22, 2022