T20 World Cup 2024 (IND vs IRE) :- भरात असलेला भारतीय संघाची आज तुलनेने दुबळ्या आयर्लंड संघाशी लढत होत आहे. तसे पाहायला गेले तर या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड राहिलेले असले तरीही आयर्लंडचा संघही जायंट किलर म्हणून प्रसिद्ध आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय संघात सर्व प्रमुख खेळाडू परतले असून त्यांच्यावर दडपण आणणे आयर्लंडला जड जाणार आहे. कारण भारतीय फलंदाजी खोलवर आहे. कर्णधार रोहित शर्मा, जयशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, शिवम दुबे असे नावाजलेले फलंदाज संघात असल्याने त्यांना कसे रोखायचे यासाठी आयर्लंड संघाला योजना तयार करावी लागणार आहे. तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह, महंमद सिराज हे नवा चेंडू हाताळतील. त्यानंतर यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव व अक्सर पटेल यांच्यावरही फिरकीची जबाबदारी राहील.
दुसरीकडे आयर्लंडचा संघ पाहिला तर कर्णधार पॉल स्टर्लिंग, मार्क व रोस अदीर, अण्ड्र्यु बिलबर्नी, कर्टीस कम्फर हे चांगले फलंदाज आहेत मात्र, भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर ते किती यशस्वी होणार हा प्रश्नच आहे. सत्यांची गोलंदाजी सरस आहे मात्र, त्यांच्याकडे अनुभवाचा अभाव आहे. जोश लिटील, नेल लॉक, बेन व्हाइट, क्रेग यंग यांना भारतीय फलंदाजांना रोखायचे आहे.
खेळपट्टी ठरणार व्हिलन
या मैदानावर रिलेड खेळपट्टी बसवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला या खेळपट्टीचा अंदाजच येत नाही हे दक्षिण आफ्रिका व श्रीलंका या सामन्यात स्पष्ट दिसून आले. त्यामुळेच या खेळपट्टीचा परिपूर्ण अभ्यास दोन्ही संघांना सरावा लागणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी सराव सत्रादरम्यान या खेळपट्टीची पाहणी केली. आता नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करायची का गोलंदाजी हा प्रश्न दोन्ही संघांसमोर निर्माण झाला. आहे. या सामन्यात विजयी सलामी देत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज होण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहणार आहे.
पावसाची शक्यता
बुधवारी येथे पाऊल पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण 20 षटकांचा होणार का त्यात काही व्यत्यय येणार याबाबत संभ्रम आहे. भारताने याच मैदानावर सराव सामना खेळताना बांगलादेशचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांना या खेळपट्टीचा अनुभव लाभला आहे त्यामुळे त्यांचेच पारडे जड राहणार आहे.
हेड टू हेड रेकाॅर्ड
भारत आणि आयर्लंडमध्ये 7 वेळा टी-20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये आयर्लंडला प्रत्येक वेळी पराभवाला सामोरे जावे लागले. तर T20 वर्ल्ड कपमध्ये भारत-आयर्लंड सामना एकदाच झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाने बाजी मारली होती.