T20 World Cup 2024 Prize Money: ICC ने जाहीर केली बक्षीस रक्कम, विजेते आणि पराभूतांवर होणार पैशांचा वर्षाव

T20 World Cup 2024 Prize Money: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने T20 विश्वचषक 2024 साठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. मंगळवारी, ICC ने US$11.25 दशलक्ष (सुमारे 93.52 कोटी रुपये) ची विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली. या रकमेपैकी विजेत्याला किमान 2.45 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 20.36 कोटी रुपये) मिळतील. यावेळी विश्वचषक विजेत्याला स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक रक्कम मिळेल, असे आयसीसीने म्हटले आहे. विशेष म्हणजे 20व्या क्रमांकावर आलेला संघही मालामाल होईल. त्यालाही बक्षिसाची रक्कम दिली जाईल.
उपविजेत्याला मिळेल 10.50 कोटींपेक्षा जास्त रक्कम –
मिळालेल्या माहितीनुसार, उपविजेत्या संघाला किमान 1.28 मिलियन डॉलर (10.64 कोटी रुपये) दिले जातील. यासोबतच इतर संघांनाही बक्षिसे दिली जाणार आहेत. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला $787,500 (रु. 6.54 कोटी) मिळतील. जे संघ दुसऱ्या फेरीच्या पुढे जाऊ शकत नाहीत ते देखील मालामाल होतील. त्यांना $382,500 (रु. 3.17 कोटी) दिले जातील.
ICC reveal historic prize money for the Men’s #T20WorldCup 🤩
Details ⬇️https://t.co/jRhdAaIkmc
— ICC (@ICC) June 3, 2024
20व्या क्रमांकावर असलेल्या संघालाही मिळतील पैसे –
यासोबतच ICC ने नवव्या ते 12व्या क्रमांकावर असलेल्या संघांसाठी बक्षीस रकमेची तरतूदही केली आहे. नवव्या ते 12व्या स्थानावर असलेल्या प्रत्येक संघाला $247,500 (रु. 2.05 कोटी) बक्षीस रक्कम मिळेल. याशिवाय 13व्या ते 20व्या क्रमांकावरील संघही मालामाल असतील. या प्रत्येक संघाला $225,000 (रु. 1.87 कोटी) दिले जातील. याव्यतिरिक्त, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी वगळता प्रत्येक सामना जिंकल्यानंतर प्रत्येक संघाला अतिरिक्त $31,154 (25.89 लाख) मिळतील. याचा अर्थ संघ उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पोहोचले नाहीत तरीही त्यांच्यावर पैशांचा वर्षाव केला जाईल.
T20 WORLD CUP PRIZE MONEY:
Winner – 20.36cr.
Runner Up – 10.64cr.– 93.52CR WILL BE GIVEN BY THE ICC IN THE PRIZE MONEY OVERALL. 🤯🏆 pic.twitter.com/1CupQwSUzk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 3, 2024
20 संघ प्रथमच भाग घेत आहेत –
T-20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच 20 संघ सहभागी होत आहेत. नववी सिरिज वेस्ट इंडिज आणि यूएसए मध्ये आयोजित केली जात आहे. यासाठी नऊ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. जिथे संघ 28 दिवस विश्वचषक खेळतील. पहिल्या फेरीत चार गटांतील 20 संघ 40 सामने खेळतील. यानंतर आठ संघ सुपर-8 मध्ये जातील. यातील 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने त्रिनिदाद-टोबॅगो आणि गयाना येथे होतील. अंतिम फेरीपर्यंत एकूण 55 सामने होतील. विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर खेळवला जाईल. आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अलर्डिस यांच्या मते, “अशा प्रकारची घटना अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. खेळाडूंना मिळणारी बक्षीस रक्कम हेच दर्शवते.”





