‘मुस्लिमांचा सर्वात मोठा शत्रू’ ; टी राजा सिंह यांचा असदुद्दीन ओवेसींवर सडकून टीका

T Raja Singh on Waqf Act । तेलंगणातील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी वक्फ (दुरुस्ती) कायद्यामुळे देशातील ‘जमीन जिहाद’ थांबेल असा दावा केला आहे. रामनवमीनिमित्त एका मिरवणुकीला संबोधित करताना भाजप आमदार टी राजा यांनी हा दावा केला आहे. याविषयी बोलताना टी राजा यांनी, “देशात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर ‘जमीन जिहादीं’साठी कठीण काळ सुरू झाला आहे. तसेच ‘ज्या लोकांनी पूर्वी कोणत्याही जमिनीवर वक्फ नोटीस चिकटवली होती आणि जमीन जिहादच्या नावाखाली फलक लावले होते ते आता ते करू शकणार नाहीत कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयक मंजूर केले आहे.’ असे म्हटले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ ला मान्यता दिली, जे गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या जोरदार चर्चेनंतर मंजूर झाले. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर, या विधेयकाचे कायदा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वक्फ कायदा मुस्लिमांकडून जमीन घेणार नाही T Raja Singh on Waqf Act ।
भाजप आमदार यांनी यावेळी, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा वक्फ बोर्डाकडे ४,००० एकर जमीन होती, आता त्यांना ९,५०,००० एकर जमीन कुठून मिळाली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, मुस्लिमांनी हे समजून घेतले पाहिजे की हा सुधारित कायदा त्यांची जमीन हिरावून घेणार नाही. राजा सिंह यांनी, “एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे ‘मुस्लिमांचे सर्वात मोठे शत्रू’ आहेत” अशी सडकून टीका केली आहे.
वक्फ कायद्याविरुद्ध ओवेसी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले T Raja Singh on Waqf Act ।
हैदराबादमधील गोशामहल मतदारसंघाचे आमदार सिंह यांनी, “सुधारित वक्फ कायद्याविरुद्ध ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या दाव्याचा कोणताही परिणाम होणार नाही. ओवैसी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, हा कायदा वक्फ आणि हिंदू, जैन आणि शीख धर्म आणि धर्मादाय ट्रस्टचे अनेक अधिकार रद्द करतो.”असेही म्हटले.
हैदराबादमध्ये मिरवणुकीसाठी २० हजार पोलिस तैनात करण्यात आले होते.
राम नवमी शोभा यात्रा रविवारी दुपारी सुरू झाली आणि रात्री उशिरापर्यंत चालली. मिरवणुका शांततेत पार पडतील याची खात्री पोलिसांनी केली आणि यासाठी सुमारे २०,००० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते आणि कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. हैदराबाद शहराचे पोलिस आयुक्त सी व्ही आनंद यांनी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजद्वारे परिस्थितीचे निरीक्षण केले आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.





