T-20 World Cup | पंच पॅनलमध्ये भारताचे मेनन
Updated On:

दुबई –आयसीसीने आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी पंच व सामनाधिकारी पॅनलची नुकतीच नियुक्ती जाहीर केली आहे.
पंच पॅनलमध्ये भारताचे नितीन मेनन हेच एकमेव व्यक्ती आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या 24 ऑक्टोबरला होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे मॉरीस ईरासमस आणि इंग्लंडचे ख्रिस गॅफेनी यांची मैदानावरील पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याचप्रमाणे रिचर्ड इलिंगवर्थ यांची दूरचित्रवाणी पंच आणि डेव्हिड बून यांची सामनाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.





