Nobel Prize 2021 : भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर; ‘हे’ 3 संशोधक मानकरी

स्टॉकहोम – भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार आज तीन संशोधकांना जाहीर झाले. गुंतागुंतीची रचना समजावून सांगण्यासाठी विकसित केलेल्या तंत्राबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या संशोधनामुळे पर्यावरण बदलासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या रचनाही सोप्या भाषेत समजावून सांगता येऊ शकणार आहेत.
मूळचे जपानमधील असलेल्या सुकुरो मानाबे आणि जर्मनीतील हॅसेलमान यांनी मिळून पृथ्वीवरील वातावरणाच्या बदलांविषयीचे भोतिक मॉडेल विकसित केले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगसारख्या अत्यंत जटील विषयाला समजावून सांगणे सोपे होणार आहे.
भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार इटलीच्या जॉर्जिओ पारिसी यांना देण्यात येणार आहे. त्यांनी आण्विक ते ग्रहपातळीवरील चढउतारांचा अंतर्गत पातळीवर होणाऱ्या बदलांचा अभ्यास त्यांनी केला आहे. या तिन्ही संशोधकांच्या संशोधनामध्ये वातावरण हा एक प्रमुख विषय आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या रचना विषद करण्यात या संशोधकांचे संशोधन फायदेशीर होणार आहे.





