Syria Damascus Serial Blast: सीरियाची राजधानी दमास्कस हादरली ; फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हॉटेलबाहेर बॉम्बस्फोट
Syria Damascus Serial Blast: सीरियाची राजधानी दमास्कस आज एकापाठोपाठ झालेल्या स्फोटांनी हादरली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सीरियाच्या दौऱ्यावर असताना हे स्फोट झाले आहेत.

Syria Damascus Serial Blast: सीरियाची राजधानी दमास्कस आज एकापाठोपाठ झालेल्या स्फोटांनी हादरली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सीरियाच्या दौऱ्यावर असताना हे स्फोट झाले आहेत.
राष्ट्रपती अहमद अल-शरा यांना भेटण्यासाठी ते राष्ट्रपती भवनात पोहोचताच स्फोटांचे आवाज ऐकू आले. महत्त्वाची बाब म्हणजे मॅक्रॉन ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत, त्या हॉटेलबाहेर बॉम्ब पडला होता.
सीरियन मीडियानुसार, दोन्ही स्फोट राजधानी दमास्कसमध्ये झाले. स्फोटांनंतर आगीच्या ज्वाळा उठताना दिसत होत्या आणि आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसत होते. महत्त्वाची बाब म्हणजे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन पूर्णपणे सुरक्षित आहेत.
सीरियाई वृत्तपत्र ‘अल-वतन’ आणि ‘सीरिया टीव्ही नेटवर्क’नुसार, राजधानीच्या मध्यभागी दोन स्फोट झाले. घटनास्थळावरून धुराचा मोठा लोट वर जाताना दिसला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन सुरक्षित आहेत.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये एक वाहन जळताना दिसत असून, रस्त्यावर रक्ताचे डाग स्पष्ट दिसत आहेत. या घटनेत किती लोक जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. (Syria Damascus Serial Blast)
ही घटना मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यादरम्यान घडली, जो दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण मानला जातो. अलिकडच्या वर्षांत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा सीरिया दौरा हे एक मोठे पाऊल मानले जाते. अशा वेळी राजधानीत झालेल्या स्फोटांच्या बातमीने जागतिक लक्ष वेधले आहे. (Syria Damascus Serial Blast)
विशेष म्हणजे, दमास्कसमधील न्याय महालाजवळील एका कॅफेमध्ये झालेल्या स्फोटक उपकरणाच्या स्फोटानंतर काही दिवसांनीच ही घटना घडली. त्या स्फोटात किमान १० जण ठार आणि २० जण जखमी झाले होते. दमास्कसमधील अल्पावधीतील ही दुसरी मोठी घटना असून, त्यामुळे शहरातील सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. (Syria Damascus Serial Blast)
सीरियाई सुरक्षा यंत्रणा सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेचा मॅक्रॉन आणि अल-शरा यांच्यातील भेटीवर काय परिणाम होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.






