S.Jaishankar : गुरुवारी फ्रान्समध्ये झालेल्या जी-7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाषण करताना, जयशंकर (S.Jaishankar) यांनी ग्लोबल साऊथमधील देशांच्या ऊर्जा, अन्न आणि इंधन सुरक्षेबाबतच्या चिंता व्यक्त केली. तसेच जागतिक प्रशासनात सुधारणांच्या तातडीच्या गरजेवरही (S.Jaishankar) भर दिला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर लवचिक व्यापारी मार्गिका आणि पुरवठा साखळीचे महत्वही त्यांनी विषद केले. S. Jaishankar या परिषदेच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हार्दिक शुभेच्छा पोहोचवल्या असल्याचेही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले. भारत जी-७ चा सदस्य नसला तरी, या शक्तिशाली गटाचे सध्याचे अध्यक्ष असलेल्या फ्रान्सने भारताला भागीदार देश म्हणून आमंत्रित केले आहे. जयशंकर (S.Jaishankar) यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान, जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वाडेफुल आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. या चर्चेत पश्चिम आशिया संकटावर प्रामुख्याने चर्चा झाली असल्याचे समजते आहे.