Syed Modi International 2024 : पी.व्ही. सिंधू आणि उन्नती हुड्डा उपांत्य फेरीत आमने-सामने….

Syed Modi International 2024 (Women’s Singles) : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि 17 वर्षीय युवा खेळाडू उन्नती हुडा यांनी शुक्रवारी लखनौमध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय 2024 बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने जिंकून आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली. तर अन्य लढतीत भारताच्याच तसनीम मीर आणि श्रीयांशी वलीशेट्टी यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
बॅडमिंटन क्रमवारीत 18व्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत 118व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या डाई वांग हिचा 21-15, 21-17 असा पराभव केला. हा सामना 48 मिनिटे चालला. तर अन्य उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या उन्नती हुडाने अमेरिकेच्या इशिका जैस्वालचा 21-16, 21-9 असा पराभव करत आगेकूच केली.
🏸 PV Sindhu defeated Dai Wang of China by 21-15, 21-17 and moves to the women’s singles semi finals of the Syed Modi India International 2024 💥#SyedModiInternational #SyedModi2024 #PVSindhu @BAI_Media @UPGovtSports @Pvsindhu1 pic.twitter.com/v10s8wFEL6
— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 29, 2024
साल 2024 च्या मोसमातील सिंधूची ही दुसरी उपांत्य फेरी असेल. आता अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सिंधूचा सामना भारताचीच युवा खेळाडू उन्नती हुड्डाशी शनिवारी(दि. 30) होणार आहे. साल 2022 मध्ये ओडिशा ओपन जिंकून सर्वात तरुण BWF सुपर 100 विजेतेपद मिळवणारी 17 वर्षीय उन्नती हुड्डा प्रथमच सिंधूशी सामना करणार आहे.
Iga Swiatek | पाच वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन ‘इगा स्विटेक’ महिनाभरासाठी निलंबित, समोर आलं ‘हे’ कारण…
महिला दुहेरीची जोडीही उपांत्य फेरीत….
राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली यांनी महिला दुहेरीत मलेशियाच्या गो पेई की आणि टिओ मेई जिंग यांचा 21-8, 21-15 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.





