विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजी राजे-बच्चू कडू एकत्र येणार ?; मविआ-एनडीएचे समीकरण बिघडणार?

Swarajya Party and Prahar Party Alliance । राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून रणनीती आखायला सुरुवात झाली आहे. अशात स्वराज्य संघटना आणि प्रहार संघटनामध्ये सर्वात मोठी घडामोड होणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक युती होणार आहे.
सध्या राज्यात महाविकास आघाडी (एमव्हीए) आणि महायुती (एनडीए) आघाडी आमनेसामने आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना (ठाकरे गट), शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहेत, तर महायुतीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि भाजप यांचा समावेश आहे.
राजकारणात नवीन आघाडी उदयास येऊ शकते Swarajya Party and Prahar Party Alliance ।
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नवी आघाडी स्थापन करण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे आणि प्रहार पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू, विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आज मुंबईत बैठक घेणार आहेत. आज महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन आघाडी उदयास येऊ शकते. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून बैठक सुरू होणार आहे.
नवीन आघाडी स्थापन करण्यासाठी बैठकीचे आयोजन Swarajya Party and Prahar Party Alliance ।
या बैठकीला स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. राज्यात नवीन आघाडी स्थापन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बच्चू कडू हे आधी महायुतीसोबत होते पण लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या जागेवरून झालेल्या भांडणानंतर त्यांनी माघार घेतली. स्वराज्य पक्षाचे संभाजी राजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्याही युतीत गेले नाहीत.





